सामाजिक

अंजनगाव सुर्जी येथे श्री. संत गाडगेबाबा पुण्यतिथी साजरी

Spread the love

अंजनगाव सुर्जी मनोहर मुरकुटे

दि. 20 डिसेंबर हा गाडगेबाबाचा पुण्यतिथी म्हणून सर्वञ साजरा करण्यात येत असतो, त्या अनुषंगाने नुकताच गणेश नगर मधील
श्री संत गाडगेबाबा बहुउद्देशीय सामाजिक संस्था अंजनगावसुर्जी येथे श्री संत गाडगेबाबा पुण्यतिथी चा कार्यक्रम सकाळी दहा वाजता संपन्न झाला. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष सर्वश्री. हि. ज. टेहरे सर,
श्री. सतिश नारोळकर, सौ. कांताबाई नवले, सौ. विजया ताई नारोळकर, किसनराव नवले, डॉ. रावसाहेब ठाकरे, साळकर सर, अघळते सर, इंगळे सर, सौ. हेमलताताई लेंधे, श्रीमती शीलाताई सगणे, इतर महिला मंडळी आणि परिसरातील मान्यवर नागरिक उपस्थित होते. याप्रसंगी गाडगेबाबा यांचे मूर्तीला पुष्पहार घालून दोन मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली समर्पित करण्यात आली. बाबांच्या जीवनातील अनमोल क्षण आपल्या भाषणातून अध्यक्ष श्री टेहरे सर, श्री साळकर सर, श्री अघळते सर, यांनी प्रतिपादित केले.या कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था व नियोजन श्री सतिश नारोळकर यांनी केले. अंततः आभार प्रदशनाने कार्यक्रम संपला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close