राजश्री शाहू महाराज कार्यगौरव पुरस्काराने श्री.पुरूषोत्तमदादा शिदे सन्मानित
नव प्रहार ) / अनिल डाहेलकर
अकोला : येथिल प्रतिष्ठीत संस्था प्रणाम कर्तृत्वाला कार्यगौरव समिती द्वारा समाजसेवेत अविरत प्रभावी आणि उल्लेखनीय कार्य करण्याऱ्या मान्यवराचा गौरव राजश्री शाहू महाराज जयंती निमित्ताने दरवर्षी करण्यात येत असतो या ही वर्षी ” वसंत सभागृह ” श्री. शिवाजी महाविद्यालय अकोला येथे कार्यगौरव पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला.
पुरुषोत्तमदादा शिंदे यांच्या संकल्पने रद्दीतून गोरगरिबांची दिवाळी ( नविन कवडे आणि फराळ) या अभिनव उपक्रमासह हिवाळ्यात गरजू गरीबांना ब्लँकेट तसेच महिलांना व बालकांना ते न् चुकता स्वेटर वाटप करीत असतात कुठे ही गवगवा न् करता . तसेच प्रसंगी गरजवंता उपचार आणि ओषधी घेवून देत असतात . पुरूषोत्तमदादांच्या याच निरपेक्ष सेवाव्रताची दखल घेवून राजश्री शाहू महाराज कार्यगौरव पुरस्कार मा.माजी मंत्री सूबोधराव सावजी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा.डॉ. सादिक पटेल ( अधिष्टाता जे जे हास्पिटल मुंबई ) यांचे हस्ते प्रदान करुन गौरविण्यात आले आहे.
या वेळी मा.श्री. लक्ष्मणराव तायडे , श्री. रमेश वानखडे , श्री.पराग गवई , श्री. संजय खडककाल, श्री.जावेद झकारिया , यांच्यासह स्वागताध्यक्ष श्री. संजय चौधरी , श्री. गजानन दाळु गुरुजी , वैधानिक विकास मंडळाचे माजी अध्यक्ष तुकाराम बिडकर , आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती.
पुरूषोत्तमदादांच्या या पुरस्काराने सम्मान झाल्याबद्दल त्यांच्या असंख्य मित्र परिवाराकडून शुभेच्छांच्या सह सर्वत्र अभिनंदन होत आहे.