शेती विषयक
शेतकऱ्यांच्या मागणीसाठी श्री.केशव पाटील जंजाळ यांचे आजपासून अनत्याग आंदोलन.
बोरगाव बु् येथील दूध उत्पादक व तरुणांनी रात्री उशिरा भेट घेत दिला आंदोलनाला पाठिंबा…
जाफराबाद:-शेतकऱ्यांची सरसगट कर्जमाफी करावी, पिक विमा तातडीने द्यावा, दुधाला 45 रुपये भाव मिळावा,सरकारने जे घोषित दुधाला 5 रुपये अनुदान घोषित केले होते ते तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे या व अन्य मागण्यासाठी लोकजागर संघटनेच्या वतीने केशव पाटील जंजाळ हे आजपासून 1 जुलै 2024 रोजी अन्नत्याग आंदोलन करणार असल्याने बोरगाव बुद्रुक येथील दूध उत्पादक व तरुणांनी केशव पाटील जंजाळ यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दिला आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते हर्षल पाटील फदाट, सुनील फदाट, तुषार फदाट, मधुकर जाधव,भागवत फदाट, फकिरबा जोशी, संतोष फदाट,पंकज फदाट, शुभम फदाट,मार्तंड कराडे, रामेश्वर चव्हाण, यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1