श्री गणेशाची मातीची मूर्ती बनविण्याची स्पर्धा संपन्न
पुसद शहरातील शाळांमधील वर्ग एक ते दहा या वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग
राजेश सोनुने पुसद तालुका प्रतिनिधी
विदर्भाची पंढरी म्हणून प्रसिद्ध असलेले पुसद येथील श्री ज्ञानेश्वर संस्थान येथे दिनांक 17 सप्टेंबर 2023 रविवार रोजी शालेय विद्यार्थ्यांची मातीच्या श्री गणेशाची मूर्ती बनविण्याची स्पर्धा मोठ्या उत्साहाने संपन्न झाली.
गणेशोत्सवासाठी थर्मोकोल ,प्लास्टर ऑफ पॅरिस चा वापर केल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत आहे .प्लास्टर ऑफ पॅरिस मुळे नद्यातील पाणी प्रदूषित होत आहे आणि त्यामुळे नदीच्या पाण्यातील जैवविविधतेला गंभीर धोका निर्माण होतो .तसेच दहा दिवस ज्या गणनायाची प्राणप्रतिष्ठा करून मोठ्या उत्साहाने पूजाअर्चा करतो ती गणरायाची सुंदर मूर्ती मातीची असल्यास विसर्जनानंतर पाण्यात विरघळून जाते आणि प्रदूषण होत नाही. परंतु प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती न विरघळता काही काळाने गणरायाच्या मूर्तीचे भगनाअवशेष दिसून येतात व ते अवशेष पाहिल्यावर आपल्या मानवी मनाला वेदनाही होतात .
यासाठी येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपल्या घरी मातीच्या मूर्तीची स्थापना व्हावी आणि ही प्रेरणा बालमनावर व्हावी आणि जनतेला सुद्धा मातीच्या श्री गणेशाची मूर्तीची स्थापना व्हावी याबद्दल जनजागरण करण्याच्या उदात्त हेतूने ज्ञानेश्वर संस्थानच्या वतीने कैलासवासी बापूराव चिददरवार स्मृती सभागृहामध्ये ही स्पर्धा घेण्यात आली.
या स्पर्धेमध्ये 290 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला.
वर्ग एक ते वर्ग 10 पर्यंतच्या सर्व वयोगटातील विद्यार्थ्यांनी अति उत्साहाने श्री गणेशाचे मातीची मूर्ती बनविल्या, विद्यार्थ्यांसोबत पालकांमध्येही उत्साह दिसून आला . या मातीच्या श्री गणेशाची मूर्ती बनविण्याच्या स्पर्धेमध्ये वसंत ताजनेकर सर नितीन पाटील सर आणि नितीन नांदेडकर सर यांनी निरीक्षकाची भूमिका उत्तम बजावली. या स्पर्धेसाठी सर्व रोख पुरस्कार आणि सन्मानचिन्ह पुसद येथील विश्वनाथ सिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसद अध्यक्ष श्री निशांत भाऊ बयास यांचे तर्फे देण्यात आले.
या स्पर्धेमध्ये वर्ग एक ते चार या अ गटातील प्रथम पारितोषिक शाश्वत अरविंद देशमुख याने तर द्वितीय पुरस्कार कुमारी अविका मंगेश व्यवहारे वर्ग चौथा विद्यालंकार पोद्दार लर्न स्कूल आणि तिसरा क्रमांक कुमारी मनवा प्रवीण चेलमेलवार वर्ग तिसरा विद्यालंकार पोदार लर्न स्कूल या विद्यार्थ्यांनी पटकविला तसेच
वर्ग पाच सहा सात या ब गटामध्ये प्रथम पुरस्कार प्रथम क्रमांक वरद दत्तात्रय चव्हाण वर्ग सात विद्यालंकार पोदार लर्न स्कूल च्या विद्यार्थ्यांनी तर द्वितीय क्रमांक कुमारी श्रुतिका विशाल
तगलपललेवार वर्ग सात सेंट मेरी इंग्लिश स्कूल या विद्यार्थिनीने तर तिसरा क्रमांक आकाश रामराव ठाकरे वर्ग सातवा राष्ट्रीय विद्यालय आडगाव यांनी नंबर पटकावला. क गटामध्ये वर्ग आठ नऊ आणि दहा या वर्गातील विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक अनय रुपेश आसेगावकर सेंट मेरी इंग्लिश स्कूल वर्ग नऊ याने घेतला तर द्वितीय क्रमांक कुणाल प्रभु वंजारे राष्ट्रीय विद्यालय आडगाव वर्ग 10 या विद्यार्थ्याने तर तृतीय क्रमांक आदित्य संजय ठोके वर्ग दहावा ल
लोकहित विद्यालय पुसद यांनी तृतीय क्रमांक पटकावला.
प्रत्येक गटासाठी प्रथम क्रमांकाला सन्मानचिन्ह आणि एक हजार रुपये रोख पुरस्कार
द्वितीय क्रमांकास सन्मानचिन्ह आणि पाचशे रुपये तर
तृतीय क्रमांकास सन्मानचिन्ह आणि 250 रुपये रोख पुरस्कार देण्यात आले.
बक्षीस वितरणाचे वेळेस व्यासपीठावर विश्वनाथसिंह बयास नागरी सहकारी पतसंस्था पुसदचे उपाध्यक्ष हरिप्रसादजी विश्वकर्मा ,निरीक्षक नितीन पाटील आणि नितीन नांदेडकर सर तसेच संस्थांनचे अध्यक्ष बिपिन चिद्दरवार यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि रोख पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
संस्थान च्या वतीने भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या या स्पर्धेतील सहभागाबद्दल प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे सर्व प्रमाणपत्र त्यांच्या शाळेमध्ये देण्यात येणार असून शाळेमार्फत त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जनजागरण व्हावे म्हणून संस्थांनी जे आवाहन केले त्या आव्हानाला असा शहरातील सर्व शाळा व संस्थांनी भरगोस प्रतिसाद दिला आणि त्यांच्या शाळेतील मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते शाळा संस्थांनी त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांसोबत त्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी प्रभारी शिक्षकांची सुद्धा त्यांनी नियुक्ती केली होती. या स्पर्धेमध्ये अ गटातील तिन्ही विजेते हे विद्यालंकार पोदार लन्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी तर ब गटातील प्रथम क्रमांक सुद्धा त्यांनीच पटकावला या सोबतच आडगाव येथील राष्ट्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ब कटामध्ये तृतीय आणि क गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त करून खेड विभागातील शाळा सुद्धा या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन त्यांनी या ठिकाणी विजयाची नोंद केली.
कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर संस्थांनने केलेल्या आवाहनाप्रमाणे या हे बनवलेले मातीचे गणपती येणाऱ्या गणेशोत्सवामध्ये आपल्या घरी बसविण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी बनवलेले मातीचे गणपती जाताना घरी नेले.या संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उदय चिददरवार सचिन ओमनवार, कैलास गादेवार, भूषण जाधव, नंदू भाऊ चौधरी ,मनोज येरावार ,अविनाश रेवनवार, विजय केशट्टीवार आणि संस्थान चे कर्मचारी व्यवस्थापक गजानन कानडे आणि दिलीप ऊचेकर यांनी अथक परिश्रम घेतले.