क्राइम

धक्कादायक ! नालसाब मुल्ला याच्या हत्येचा कट तुरुंगात रचल्याचे उघड 

Spread the love

सांगली /” नवप्रहार न्यूज नेटवर्क

                          काही दिवसांपूर्वी नालसाब मुल्ला या राष्ट्रवाडी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी पोलीस तपासात धक्कादायक खुलासा झाला आहे. मोका अंतर्गत तुरुंगवारी करत असलेल्या सचिन डोंगरे याने तुरुंगातून मोबाईल च्या साह्याने हे हत्याकांड घडवुन आणल्याचे उघड झाले आहे.

.याबाबत अधिक माहिती अशी की, सांगलीतीील  नालसाब मुल्ला या युवकाचे शंभर फुटी रस्त्यावर बाबा चौकात निवासस्थान आहे. आठवड्यापुर्वी तो वाचनालयाजवळ थांबला असताना त्याची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात एलसीबीच्या पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. तिघांना अटक केली. या हल्लेखोरांनी गुन्ह्याची कबुली देताना धक्कादायक माहिती समोर आली आहे.

स्वप्निल मलमे तीन साथीदारांसह माने चौकात आला. स्वप्निल व सनी यांनी आठ गोळ्या झाडल्या. विशाल कोळपेने धारदार एडक्याने हल्ला चढवला. त्यात मुल्लाचा मृत्यू झाला. हल्लेखोरांच्या मदतीसाठी आणखी तिघे दबा धरून बसल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली. तिघांनाही सापळा रचून अटक करण्यात आली. हल्लेखोरांनी खुनाची कबुली दिली आहे.


खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार सचिन डोंगरे हा ‘मोका’ कारवाईअंतर्गत कळबा जेेेलमध्येआहे. तेथूनच त्याने कट रचल्याची कबुली हल्लेखोरांनी दिली. त्यानुसार मोका न्यायालयाच्या परवानगीनुसार त्याला आज अटक करण्यात आली.कळंबा जेलमधून रचला कट…

दरम्यान, तपासात अनेक कंगोरे समोर आले. डोंगरे हा मोबाईलवरून संपर्कात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी कारागृहाची झडती घेतली आहे. कुख्यात गुन्हेगार आता पोलिसांच्या रडारवर आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close