सामाजिक

ब्रह्माकुमारीजद्वारे वलगांव मध्ये शिवसंदेश

Spread the love

 


बाळासाहेब नेरकर कडून

प्रजापिता ब्रह्माकुमारी शाखा वलगाव च्या वतीने दि.10/11/24 ला तणाव मुक्त जीवन जगण्याकरता जिल्हा संचालिका राजयोगीनी सीतादीदी यांनी शिवसंदेश सर्व नागरिकांना
दिला.
ब्रह्माकुमारी शाखा वलगांव व मळसने परिवार यांच्या वतीने गावांमध्ये प्रथम व्यसनमुक्त जीवन तणावमुक्त जीवन हा संदेश देण्याकरता शोभायात्रा काढण्यात आली होती. जिल्हा संचालिका राजयोगिनी सीता दीदींनी आपले मनोगत व्यक्त करताना
समाजामध्ये जात धर्माच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात द्वेष भावना निर्माण होत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी वर्ग सुद्धा दुःखी आहे. त्याचाच परिणाम म्हणून प्रत्येकाच्या जीवनामध्ये तणाव व निराशा आलेली आहे. यामुळे आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे या समस्येवर मात करण्यासाठी जीवनामध्ये सकारात्मक चिंतन व सोबतच मेडिटेशनचे नितांत आवश्यकता आहे. ब्रह्माकुमारी विद्यालयाद्वारे साप्ताहिक कोर्स व सहज राजयोग निशुल्क शिकवल्या जातो याचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घेण्याचा आव्हान याप्रसंगी केले. प्रमुख अतिथी म्हणून वलगांव पोलीस स्टेशनचे पीएसआय रवींद्र खेडकर यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना प्रत्येक क्षेत्रामध्ये तणाव असल्यामुळे व्यक्तीमध्ये आपोआपच निराशा येते आणि त्याकरता ध्यान आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळेस गाडगे महाराजांचे अनुयायी कैलास दादा बोडसे ,शिव मंदिराचे अध्यक्ष महादेव निर्मळ, प्रा. डॉ. पवन वानखडे फॉरेन्सिक मेडिसिन सांगवी मेघे, ग्रामपंचायत सदस्या यांची सुद्धा उपस्थिती होती. यावेळेस ‘जल ही जीवन’ या विषयावर उत्कृष्ट निबंध लेखन करता पंजाबराव देशमुख विद्यापीठाद्वारे 21 हजार रुपये रोख व पारितोषिक मिळाल्याबद्दल देवयानी चित्रकार हिचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळेस अमरावती जिल्ह्यातील ब्रह्माकुमारी सेंटरच्या सर्व तहसीलच्या संचालिका उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पवनजी चित्रकार, कांचन चित्रकार, मळसने मामी, अरुणभाई धरपाड, गोपालभाई, सोपानभाई, गणेशभाई, अशोकभाई, संजयभाई गुप्ता, सुभाषभाई भटकर, यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन मुक्ता दीदी तर आभार प्रदर्शन पल्लवीताई कानफाडे यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close