Uncategorized

शिवजयंती निमीत्य घाटंजीत व्याख्यान

Spread the love

 

झाकल ते सुरक्षित असतं उघड्यावर माशा बसतात!. संस्कृती जतण करा अन्यथा पतण निश्चित यूवा व्याख्याते कनेरकर परखड शब्दात महीला व यूवकास मार्गदर्शन

घाटंजी ता. प्रतिनिधि- सचिन कर्णेवार

घाटंजी छत्रपती महोत्सव घाटंजी व्दारे दरवर्षी तिथी नूसार शिवजयंती सोहळा साजरा करण्यात येतो, यावर्षी सुध्दा फाल्गुन वद्य तृतीया दिनांक २८ मार्च सायं. ६ वाजता छत्रपती महोत्सव २०२४ वर्ष ११ व साजरा करण्यात आले.घाटंजी गिलाणी महाविद्यालया जवळ या शिवजयंती सोहळयाचे आयोजन करण्यात आले. या शिवजयंती सोहळयाचे प्रमुख आकर्षन युवा प्रबोधनकार, युवकांचे प्रेरणास्थान, प्रखर विचारवंत मा. सोपानदादा कनेरकर यांच्या जाहीर व्याख्यानाचा कार्यक्रम होता.कार्यक्रम सूरवात शिवछत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पुजन उपस्थित माण्यवर हस्ते माल्यार्पण करून करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख अतिथि म्हणून दैनिक पुण्यनगरी प्रतिनिधि अनंत नखाते, समिती अध्यक्ष निखील देठे, व सत्कार मुर्ती म्हणून, मा.श्री. विनाकरावजी ठाकरे (सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता, सा.बा.वि. महाराष्ट्र शासन). मा.श्री. खुशालजी नागपुरे व परिवार (स्व. मातोश्री सुशिलाबाई नागपुरे वृध्दाश्रम आणि), कुमार ओंकार प्रफुल सिडाम (राज्यस्तरीय स्केटींग चॅम्पियन) व श्री. सूरज अशोकराव हेमके (अविरत अन्नदान सेवा, जिव्हाळयाची भिंत चॅरीटेबल ट्रस्ट, घाटंजी हे उपस्थित होते.शिवपूजन नंतर समिती व्दारा नियोजित समाजीक जान असलेल्या विवीध क्षेत्रात उलेखणिय कार्य करणा-या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यात विनायक ठाकरे घाटंजी सेवा निवृत अभियंता,
खुशाल नागपुरे वृद्धाश्रम चालक व सेवाभाव अनेक आई वडीलाचा श्रावण बाळ ठरलेले तसेच विचार “कुंटूब श्रध्दाश्रम झाली की वृध्दाश्रम होत नाही या प्रमाणे चालणारे यांचा सत्कार,ओमकार सिडाम स्केटींग सुवर्ण पदक विजयते कला क्षेत्र. सुरज हेमके माणुसकीची भिंत माध्यमातून अपंग निराधार सेवा देत निस्वार्थी पणातून अन्नाचा घास भरवणारे यांचा सत्कार घेण्यात आला. तदनंतर युवा व्याख्यान कार कनेरकर यांचे व्याख्याणातून ‘जगण शिकाचं असते पण,जगतांना प्रसिद्धी साठी नाही जगाचं तर कर्म करत जगायचं कारण प्रसिध्दी पचवण कठीण आहे. आपले सुख दूस-याचे सूखात हवं पण,सध्या ब-याच जणाची मानसिकता आपले चिंतन दूस-याला चिंता देण्यात असते! ही वृत्ति सूटली पाहीजे.ज्या तरुणास रात्री टूल होऊं असल्यान धरुन आणाव लागते ते तरुण देशांच भवितव्य असूच शकत नाही. हे परखड मत व्याख्यनातून मांडत यूवकास मार्गदर्शन केले. तसेच नावांत ताकत असते पण,नावानूसार वागणूक ही हवी. महीलांना संस्कृती बाबत बोलतांना कनेरकर परखड सत्य बोलेले “झाकल ते सुरक्षीत असते आणि जे उघड़ असते त्यावर माशा बसतात!” तसचं स्रीयाचे शरीर ही झाकुणच चांगल असते अंग प्रदर्शन नको तर संस्कृती जतण करायला हवी.जिथ धर्मजतण नाही तिथ पतण निश्चित. संध्या मोबाईलचे वाढत भुत त्यात ईस्टाची रिल पलटवण्यात यूवकांचे आयूषाची रिल संपते आहे. हा गंभिर व चिंतेचा विषय आहे. त्यावर यूवकांनी चिंतन कराया हवे. घाटंजी शहरातील युवकांनी समाज प्रबोधन व मार्गदर्शन कार्यक्रम घेऊन समाजिक जाणिव जपली तसेच भरगचं नागरीकांनी या कार्यक्रमात सहभागी होऊन आयोजक छत्रपती महोत्सव समिती, घाटंजी ला प्रतिसाद दीला यावरून घाटंजीकर जागृत असल्याचेही ते बोलले. कार्यक्रम प्रस्तावणा निखील देठे आणि आभार प्रदर्शण वैभव मलकापुरे यांनी केले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close