शिवजयंती महोत्सव 19 फरवरी ते 24 फरवरी पर्यंत चांदुर रेल्वे शहरात साजरा होत आहे
चांदुर रेल्वे तालुका प्रतिनिधी
प्रकाश रंगारी
शिव,शाहू,फुले,आंबेडकर विचार मंच चांदुर रेल्वे चांदुर रेल्वे तर्फे.
शिवजयंती महोत्सव सप्ताह दिनांक 19 फेब्रुवारी ते 24 फेब्रुवारी पर्यंत चांदुर रेल्वे शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करण्यात येत आहे
19 फेब्रुवारीला सकाळी नऊ वाजता भव्य मोटर बाईक रॅली छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पुतळ्यापासून संपूर्ण शहरांमध्ये काढण्यात आली. दिनांक 20 फेब्रुवारीला श्री छत्रपती सामान्य ज्ञान स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये वर्ग सहा ते नऊ या वर्गातील विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामध्ये वर्गनिहाय प्रथम बक्षीस पाचशे रुपये, द्वितीय बक्षीस तीनशे रुपये, तृतीय बक्षीस दोनशे रुपये. व प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. दिनांक 21 तारखेला छत्रपती शिवाजी महाराज स्पर्धा घेण्यात येईल यामध्ये विषय आणि बाल शिवाजी महिला व लहान मुलं सहभाग घेऊ शकतात. यामध्ये प्रथम बक्षीस हजार रुपये, द्वितीय बक्षीस सातशे रुपये, तृतीय बक्षीस पाचशे रुपये स्पर्धकाने मा जिजाऊ साहेबांनी बाल शिवाजी यांच्यावर आधारित एक रील ( व्हिडिओ ) बनवून तो शिव शाहू फुले आंबेडकर विचार मंच ह्या ह्या स्टॅगने फेसबुकवर टाकून त्यांची लिंक 8624096021 ह्या व्हाट्सअप नंबर वर पाठवावी ती रील कार्यक्रम स्थळी दाखवण्यात येईल. वक्तृत्व स्पर्धा यामध्ये सहभागी होणारे विद्यार्थी महाविद्यालयीन असतील त्याचा विषय आहे शिवरायांचे प्रजासत्ताक धोरण वकृत्व स्पर्धेचे ठिकाण राजश्री शाहू विज्ञान महाविद्यालय चांदुर रेल्वे वेळ सकाळी 11 वाजता यामध्ये सुद्धा प्रथम बक्षीस एक हजार रुपये, द्वितीय बक्षीस सातशे रुपये, वक्तृत्वाचा कालावधी तीन मिनिटांचा असेल. 23 फेब्रुवारीला शिवछत्रपती चित्रकला प्रदर्शनी शिवाजी महाराजांचा जीवनातील एखादा प्रसंग यामध्ये बारा वर्षांवरील सर्व विद्यार्थी सहभागी होऊ शकतील. बक्षिसांचे स्वरूप प्रथम बक्षीस 1000 रुपये द्वितीय बक्षीस 700 रुपये तृतीय बक्षीस 300 रुपये देण्यात येईल. सोबतच संत गाडगेबाबा जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबवण्यात येईल. आणि दिनांक 24 फेब्रुवारीला शिवव्याख्याते प्राध्यापक माननीय नितीन बानगुडे पाटील यांचे शिव व्याख्यान संध्याकाळी सहा वाजता स्थळ जिल्हा परिषद शाळेचे मैदान चांदुर रेल्वे येथे होणार आहे. अशी माहिती दिनांक 20 फेब्रुवारीला विश्राम गृह चांदुर रेल्वे येथे झालेल्या पत्रकार परिषद मध्ये शिव शाहू फुले आंबेडकर उत्सव समितीचे अध्यक्ष डॉक्टर सागर वाघ, प्राध्यापक प्रभाकरराव वाघ, कृषी बाजार समितीचे सभापती गणेश भाऊ आरेकर, पंचायत समिती चांदुर रेल्वे सदस्य अमोलभाऊ होले, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्रीनिवासभाऊ सूर्यवंशी, माजी नगराध्यक्ष श्री निलेशभाऊ सूर्यवंशी, माजी नगरसेवक सतपालभाऊ वरठे, माजी नगरसेवक गोटूभाऊ गायकवाड हे उपस्थित होते.