हटके

काही तरीच काय ?  येथे मृत्यू साठी यामराजची नाही सरकारची मर्जी चालते

Spread the love

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया नेटवर्क

       याठिकाणी  मृत्यू साठी यमराज नाही तर सरकारची मर्जी लागते असं म्हटलं तर तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.पण ही गोष्ट मात्र खरी आहे. यामागे कारण देखील वैज्ञानिक आहे. त्यामुळे

            पण जगात एक असं ठिकाण आहे, जिथे सरकारने लोकांच्या मरणावर बॅन लावला आहे. इथं यमराजाला नो एंट्री आहे. हे ठिकाण नॉर्वेतील लॉन्ग इयरबेन इथं आहे. इथं 1917 मध्ये शेवटचा मृत्यू झाला होता. त्यानंतर अजूनपर्यंत इथे एकाही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. या भागात कडाक्याची थंडी पडते. मेपासून जुलैपर्यंत सूर्यास्त होत नाही. सलग 76 दिवसांपर्यंत सुर्योदय असतो. म्हणजेच इतके दिवस इथे रात्र होत नाही. यादरम्यान इथे अतिशय थंडी असते. याच ठिकाणी सरकारने लोकांच्या मृत्यूवर बॅन लावला आहे. यामागे एक खास कारणही सांगितलं जातं.

इथं एखाद्याचं निधन झालं, तर मृतदेह पुरल्यानंतर तो कडाक्याच्या थंडीमुळे कुजत नाही. अशा परिस्थितीत मृतदेह शतकानुशतके तसाच पडून राहतो. इन्फ्लुएंजामुळे 1917 मध्ये त्या व्यक्तीचं निधन झालं होतं. त्या व्यक्तीला मृत्यूनंतर पुरण्यात आलं. पण तिथे थंडी इतकी असते, की आतापर्यंत मृतदेह तसाच आहे. त्यामुळे बॉडीमध्ये अद्यापही इन्फ्लुएंजाचे व्हायरस तसेच आहेत. त्यानंतर सरकारने इथे मरणावर बॅन लावला. आता महत्त्वाची बाब म्हणजे सरकारने बॅन लावला म्हणून मृत्यू होणं हे टाळता येतं का?

जेव्हापासून या ठिकाणी मरणावर बॅन लावण्यात आला, तेव्हापासून येथील लोकांच्या मृत्यूआधीच त्यांना या ठिकाणाहून एका दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं. इथे राहणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तब्येत बिघडली, तर त्याला लगेच दुसऱ्या ठिकाणी पाठवलं जातं. तिथे त्या व्यक्तीची देखभाल केली जाते. परंतु त्या व्यक्तीचा मृत्यू झाला, तर तिथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातात.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close