खेळ व क्रीडा

शिवम दुबे ला घरी पोहचण्यासाठी करावी लागली कसरत 

Spread the love

मुंबई / प्रतिनिधी

T 20 वर्ल्ड कप मध्ये  अंतिम सामन्यात न्यूझीलंड ला नमवून वर्ल्ड कप वर आपले नाव कोरले आहे. या विजयाचा आनंद साजरा करून सगळे खेळाडू आप आपल्या घरी परतले. पण यातील एका खेळाडूला ला अशी काही सर्कस करावी लागली की वाचून तुमच्याही चेहऱ्यावर हास्य येईल. सर्व खेळाडू विमानाने आपापल्या घरी परतले, मात्र एक खेळाडू चक्क पत्नीसह रेल्वेने आपल्या घरी आल्याचे समोर आले आहे.

टी-20 वर्ल्डकपच्या फायनलमध्ये तळाला फलंदाजीला येऊन धावांचा पाऊस पाडणारा शिवम दुबे पत्नीसह अहमदाबादहून मुंबईला परतला आहे. हिंदुस्थानच्या विजयामध्ये मोलाचा वाटा उचलणारा दुबे विमानाने नाही तर चक्क सयाजी एक्सप्रेसने मुंबईला आल्याचे समोर आले आहे. मैदानात गोलंदाजांचे वाभाडे काढणारा दुबे वर्ल्डकप जिंकल्यानंतर अवघ्या काही तासांत ‘अहमदाबाद-मुंबई सयाजी एक्सप्रेस’च्या 3-टायर एसी डब्यात वरच्या सीटवर रेल्वेची जाड चादर ओढून शांतपणे झोपला होता. या डब्यातील इतर प्रवाशांना संशयही आला नाही की आपल्या बाजूला वर्ल्ड चॅम्पियन खेळाडू बसला आहे. याबाबत त्याने स्वत: माहिती दिली असून ओळख लपण्यासाठी काय काय जुगाड करावा लागला हे देखील त्याने सांगितले आहे.

फायनलमध्ये अवघ्या 8 चेंडूत 26 धावा कुटणाऱ्या शिवमला सामना संपल्यानंतर आपल्या कुटुंबाला, विशेषतः 4 वर्षांचा मुलगा अयान आणि 2 वर्षांच्या मुलीला भेटण्याची ओढ लागली होती. पण अहमदाबादमधील सर्व विमानं हाऊसफुल्ल होती. अशात रस्ते प्रवासापेक्षा ट्रेन जलद पडेल म्हणून शिवमने पत्नी अंजुम आणि एका मित्रासह गुपचूप रेल्वेचे तिकीट काढले. स्टेशनवर चाहत्यांची गर्दी पाहून शिवमने आपला चेहरा मास्क आणि टोपीने पूर्णपणे झाकून घेतला होता. गाडी सुटण्याच्या फक्त 5 मिनिटे आधी तो कारमधून उतरून थेट डब्यात शिरला आणि गुपचूप अपर बर्थवर जाऊन बसला.

प्रवासादरम्यान जेव्हा तिकीट चेकर आले, तेव्हा त्यांनी नाव पाहून आश्चर्याने विचारले, शिवम दुबे? तो क्रिकेटर का? यावर पत्नी अंजुमने प्रसंगावधान राखत हसत उत्तर दिले, नाही हो, तो कशाला इथे येईल? टीसीला उत्तर पटलं आणि शिवमची ओळख उघड होता होता वाचली.

सुरुवातीला प्रवासात कोणाचे शिवम दुबेकडे लक्ष गेले नाही, पण मुंबईच्या बोरीवली स्टेशनवर उतरताना गर्दीत ओळख पटण्याची भीती होती. अखेर शिवमने पोलिसांना फोन करून मदत मागितली. जेव्हा पोलिसांनी त्याला विचारले की, ‘विमानतळावर कुठे यायचे?’ तेव्हा शिवमने ‘मी रेल्वेने येतोय’ सांगताच पोलीसही चक्रावून गेले. अखेर पोलीस बंदोबस्तात शिवम सुखरूप आपल्या घरी पोहोचला. ‘इंडियन एक्सप्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close