शिवाजी शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव
मोर्शी(तालुका प्रतिनिधी) दि.२०/८
शालेय जीवनात शैक्षणिक,कला,क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादित करणाऱ्या गुणवंतांचा गुणगौरव हा इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत तहसीलदार सागर ढवळे यांनी शिवाजी शाळेत गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी बोलतांना व्यक्त केले.
स्थानिक शिवाजी उच्च माध्यमिक शाळेत सत्र 2022-23 मध्ये माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता यादीत येणाऱ्या व एनसीसी तथा क्रीडा क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कार्य करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले.याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक प्रसाद देशमुख तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार सागर ढवळे,उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश पांडे,श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे आजीवन सदस्य नानासाहेब पाटील,बाळासाहेब गावंडे, दिनेश अर्डक,शरदचंद्र बिडकर,जेष्ट पत्रकार संजय गारपवार,गजानन हिरुळकर,अजय पाटील,माजी मुख्याध्यापक एम.डब्ल्यू.चौधरी,मनोहरराव जाणे,दिलीप वानखडे,एनसीसी ऑफिसर श्रीकांत देशमुख,मनोज देशमुख,शिक्षक प्रतिनिधी अजय हिवसे,विद्यार्थी प्रतिनिधी शुभम इंगळे उपस्थित होते.
मोर्शी तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी शाळेला दिलेल्या रोखस्वरूपातील दानातून माध्यमिक शालांत परीक्षेत मोर्शी तालुक्यात प्रथम आलेला पार्थ धुळे याच्यासह सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ,सन्मानचिन्ह व रोखरक्कम देवून सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रेमा नवरे,मिलिंद ढाकुलकर,प्रास्ताविक राजेश मुंगसे तर आभार अजय हिवसे यांनी केले.याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी,पालक व शिक्षक उपस्थित होते.