हटके

कॉम्प्लेक्स मध्ये घुसली मगर लोकांची उडाली तारांबळ

Spread the love
मुंबई / नवप्रहार डेस्क
            समुद्रात किंवा मोठ्या नदीत आढळणारी मगर मुबई च्या  मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये आढळून आल्याने लोकांची तारांबळ उडाली होती.
 ही मगर धीरुभाई अंबानी शाळेजवळून वाहणाऱ्या मिठी नदीच्या पात्रात आढळून आली आहे. यामुळं परिसरात मात्र काहीसं भीतीचं वातावरण आहे.
बीकेसी परिसरात मगर आढळल्याची माहिती तात्काळ वाईल्ड लाईफ ऍनिमल प्रोटेक्शन अँड रेस्क्यू असोसिएशननं वन विभाग तसेच RAWW या संस्थेला देण्यात आली. यानंतर वनविभागाने ताबडतोब मगर आढळून आलेल्या ठिकाणी पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.
दरम्यान, मुंबईत कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळं मिठी नदीच्या पाण्याच्या प्रवाहात ही मगर वाहत आली असावी असा अंदाज वन विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसंच ही मगर मानवी वस्तीत नसून तिच्या नैसर्गिक अधिवासातच आहे, त्यामुळं नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन वनविभागाकडून करण्यात आलं आहे.
अद्याप या मगरीचा शोध घेण्याचं काम वनविभागाकडून सुरू असून मगरीला रेस्क्यू करण्यात यश आलेलं नाही.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close