राष्ट्रसंताच्या कर्मभूमीत ११५ व्या ग्राम जयंतीनिमित्त निमित्य गुरुकुंज मोझरी येथे शेतकरी ग्रामनाथ पुरस्कार वितरित.
मोझरी / प्रतिनिधी
११५ व्या ग्राम जयंती महोत्सव गुरुकुंज मोझरी येथे यावर्षी भव्य दिव्य असा कार्यक्रम सोहळा पार पडला २७एप्रिल ते ३० एप्रिल पर्यंत ग्राम जयंती प्रचारार्थ मोटर सायकल रॅली सामूहिक ग्रामगीता पठन व मार्गदर्शन ज्ञान यज्ञसमारोप महासमाधिअभिषेक पूजन व तीर्थस्थापंना अखंडविना प्रारंभ सामुहिक ध्यान व चिंतन खंजिरी भजन सत्संग श्री गुरुदेव अध्यात्म सत्संग मंडळ गुरुदेव नगर सामुदायिक प्रार्थना व मार्गदर्शन प्रबोधन सुधार किर्तन समुदायिक ध्यान व चिंतन ग्रामसफाई खंजेरी भजन गुरुदेव महिला मंडळ गुरुदेव नगर सामुदायिक प्रार्थना व महासमाधी औक्षण पालख्यांची मिरवणूक तथा प्रतिमेची शोभायात्रा हे सर्व कार्यक्रम पार पडले. यावर्षी तुकडोजी महाराजांच्या महासमाधीसमोर पाच प्रामाणिक व होतकरू शेतकऱ्यांचा ग्रामनाथ शेतकरीसन्मान देऊन सत्कार व गौरव करण्यात आला. यामध्ये श्री पुष्पक श्रीरामजी खापरे पिंपरी पूर्णा
श्री नितीन सुरेशराव कुरवाडे शिवणगाव
श्रीमती माधुरीताई विश्वासराव कडू शिरज गाव मोझरी
श्री देवेंद्र प्रभाकरराव ठाकरे गुरुदेव नगर
श्री सतीशराव आबाराव बाविस्कर रघुनाथपूर या सर्व शेतकऱ्यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीसमोर शाल श्रीफळ सन्मानचिन्ह प्रत्येकी एक हजार रुपये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा फोटो आयुर्वेदिक किट, ग्रामगीता देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी मा सौ पुष्पाताई बोंडे श्रीलक्ष्मणराव गमे श्री दामोदर पंत पाटील श्री प्रकाश महाराज वाघ जनार्धनपंथ बोथे श्री प्रा. सुहास टप्पे उपस्थित होते. या महोत्सवात सर्व पंचक्रोशीतील भक्तगण सुद्धा होते तसेच कार्यक्रमाच्या नंतर काल्याचे कीर्तन ह भ. प श्री सुशीलजी वणवे महाराज यांचे झाले.त्या नतर महाप्रसाद सुद्धा वितरित करण्यात आला. याप्रसंगी सर्व गावातील तरुण वर्ग महिला मंडळी यांचे सुद्धा कार्यक्रमाकरिता भरपूर सहकार्य लाभले.