हटके

शेतातील हिरवळीची पाहणी करण्यात गुंग असलेल्या तरुणाच्या जवळ आला नागोबा 

Spread the love

                    सध्या सगळीकडे सुरू असलेल्या  पावसामुळे पेरण्या आटोपल्या आहेत आणि पीक डोलायला लागली आहेत. डोलणारी हिरवीगार पिके शेतकऱ्यांना खूप आवडतात. कारण याच पिकांवर त्यांचे आणि कुटुंबीयांचा वर्षभराचा उदरनिर्वाह चालतो.शिवाय पीक चांगले झाले की दोन पैशे पदरी पडतात. म्हणून शेतात गेल्यावर एखाद्या झाडाखाली अथवा बांधावर बसून शेतकरी पिकांकडे पाहून भविष्याची स्वप्ने रंगवत असतो. शेताच्या बांधावर बसून पिकाची पाहणी करणाऱ्या तरुणासोबत भलतेच घडले असते. पण सुदैवाने त्याला कुठलीही इजा झाली नाही. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगकेच व्हायरल होत आहे. 

हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल. सुदैवाने तो थोडक्यात वाचला आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक व्यक्ती शेताच्या शेजारी निवांत बसलेला आहे. हळूच त्याच्या मागून साप येताना दिसत आहे. जेव्हा साप त्या व्यक्तीला स्पर्श करतो तेव्हा तो व्यक्ती मागे वळून पाहतो आणि त्याला डोळ्यासमोर साप दिसतो. साप दिसताच व्यक्ती जागेवरुन उठतो आणि स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न करतो. थरकाप उडवणारा हा व्हिडीओ आहे.

india.yatra या इंस्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजर्सनी लिहिले आहे, “ही ओव्हर अॅक्टिंग आहे. व्हिडीओ ठरवून केलेला आहे” तर एका युजरने लिहिले, “शूट करणाऱ्या व्यक्तीला व्हिडीओ इतका महत्त्वाचा होता का?” आणखी एका युजरने लिहिले आहे, ” शूट करणाऱ्याने त्या व्यक्तीला त्याच्या पाठीमागे साप आहे, हे का सांगितले नाही?”

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close