क्राइम

तिने गुप्तांगामध्ये लपवून आणले होते लाखोंचे सोने पण कस्टम अधिकाऱ्यांनी तिला हेरले

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

         दुबई वरून आलेल्या महिलेची हालचाल संशयास्पद वाटल्याने विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी तिच्यावर नजर ठेवली.ग्रीन चॅनल मधून ती जेव्हा निघाली तेव्हा अधिकाऱ्यांना तिने शरीरात काहीतरी लपवून आणल्याचे आढळले. यावेळी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने तेथील महिला अधिकार्‍यांना गुप्तांगात लपवून आणलेल्या सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल काढून दिल्या. याप्रकरणी एका 41 वर्षीय महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै रोजी एक प्रवासी महिला स्पाईसजेट या विमानाने दुबई ते पुणे असा प्रवास करत होती. यावेळी पुणे विमानतळावर आल्यानंतर तपासणी करणार्‍या कस्टमच्या अधिकार्‍यांना तिची हालचाल थोडी संशयास्पद वाटली. तपासणीसाठी असलेल्या ग्रीन चॅनेलमधून ती जेव्हा गेली तेव्हा तिच्या शरीरात तीने काही तरी लपवून आणल्याचे त्यांना आढळले. यावेळी तिच्याकडे विचारणा केल्यानंतर तिने तेथील महिला अधिकार्‍यांना गुप्तांगात लपवून आणलेल्या सोन्याची पेस्ट असलेल्या कॅप्सूल काढून दिल्या. अधिक तपासणीसाठी तिला रूग्णालयात नेऊन तिचा एक्सरे देखील घेण्यात आल्या. परंतु, तिने तिच्या जवळील उपलब्ध असलेल्या कॅप्सूल काढून दिल्या होत्या. या महिलेने तिच्या बरोबर 423.41 ग्रॅम वजनाचे तब्बल 20 लाख 30 हजारांचे सोने लपवून आणल्याचे कस्टम विभागाने स्पष्ट केले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close