शेतातील अवैध कुंपनाचा शाॕक लागुन युवकाचा दुर्दैवी मृत्यु
ता.प्रतीनिधी;/ अंजनगांवसुर्जी
गोठ्यात जनावरांना चारा टाकुन येतो म्हणुन घरुन निघालेला तरुणाला शेतातील अवैद्य आकोडे टाकुन लावलेल्या कुंपणाचा विजेचा शाॕक लागुन ३५ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना विहीगाव (ता.अंजनगांवसुर्जी ) गावात घडली . या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे .
रहिमापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले विहिगाव येथील युवक अंकुर अरुणराव बेलसरे रा. विहिगाव वय३५ हा दि.८च्या रात्री घरून गोठ्यात जनावरांना चारा टाकून येतो असे घरच्यांना सांगुन रात्री नऊ ते दहाच्या दरम्यान घरातून गेला त्याची ही रोजचीच दिनचर्या असल्याने घरच्यांनि लक्ष दीले नाही, परंतु तो उशीरारात्री पर्यत ही परत आला नसल्याने व फोनही उचलत नसल्याने त्याचा आजुबाजुस शोधाशोध घेतल्यावर अंकुर मिळत नसल्याने अखेर रहिमापूर पोलीस स्टेशनला मिसींग फिर्याद दाखल केली.दुसरे दिवशी (दि./९)नातेवाईक व शेजारी पाजाऱ्यांनी त्याचा शोध घेतला असता सकाळी दहा ते अकरा वाजता गावाजवळीलच शफि नियाजिच्या (रा.अंजनगांवसुर्जी) शेतात मृतावस्थेत आढळला, लागवडीने दिलेल्या शेतात वन्य प्राण्यांचा त्रास असल्याने लागवडदाराने विद्युत वाहीनी वरुन आकोडे टाकुन अवैध पध्दतीने ताराच्या कंपाऊंडमधे विद्युत प्रवाह सोडला होता त्याच्या सानिध्यात अकुर आल्यानेच त्याचा जबर शाॕक लागून मृत्यू झाल्याचे गावामध्ये कुजबूज सुरू होती.घटनेची माहीती रहीमापुर पोलीसांना दील्यावर पोलीसांनी पंचनामा करुण मृतक अंकुर बेलसरे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छादन साठी अंजनगाव ग्रामीण रुग्णालय येथे पाठविण्यात आला पुढील तपास निलेश देशमुख ठाणेदार मार्गदर्शनात एएसआय गजानन ढोकेकर ,एएसआय बाबुराव लुटे,संदीप वाघमारे व पोलीस कर्मचारी करीत असुन मृतक अंकुर आईवडीलांचा एकुलता एक मुलगा असल्याने तथा त्याच्या पश्च्यात पत्नी , दोन लहान जुडवा मुले यांचे छत्र हरवल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे. ——————————————————————- यावेळी विद्युत वितरणचे उपकार्यकारी अभियंता सतीश नंदनवंशी यांनी असे म्हटले की
शेतातून गेलेल्या लाईनवर अवैधरीत्या वीज घेऊन कंपाउंड ला करंट लावल्यामुळे त्या युवकाचा मृत्यू झाला असावा –
पोलीस घटनास्थळी पोहोचलो तेव्हा प्रथमदर्शनी आम्हाला मृतकाच्या पायाला कंपाऊंडचा बारीक तार लागल्याचे आढळून आले त्यामुळे त्याचा करंट लागूनच मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. चौकशी झालेवर व शवविच्छेदन अहवाल आल्यावर कारन स्पस्ट होईल. घातपात असल्याच्या अफवा आहेत. ( निलेश देशमुख ,ठाणेदार रहिमापूर पोलीस स्टेशन)