विशेष

शास्त्रज्ञांना सापडले नरकाचे दार ;  नासाने  लावला सर्वात मोठ्या ब्लॅक होल चा शोध 

Spread the love

 अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या कृष्णविवर म्हणजेच ब्लॅक होलचा शोध लावला आहे. नासाने आपल्या आकाशगंगेपासून जवळच असणाऱ्या M87 आकाशगंगेत असलेल्या या ब्लॅक होलचा शोध लावला .

M87 आकाशगंगेच्या मध्यभागी प्रचंड मोठे ब्लॅक होल असून, याचा आकार सूर्यापेक्षा तब्बल 2.6 अब्ज पट मोठा आहे.

प्रचंड मोठ्या ब्लॅक होलमुळे शास्त्रज्ञ देखील चकीत झाले आहेत. अनेक शास्त्रज्ञ या ब्लॅक होलचा उल्लेख ‘नरकाचा दरवाजा’ असा करत आहेत. हा शोध नासाच्या हबल स्पेस टेलिस्कोपने काढलेल्या फोटोद्वारे लागला आहे.

या फोटोमध्ये M87 च्या मध्यभागी शक्तिशाली गुरुत्वाकर्षण शक्ती असल्याचे आढळून आले. ही आकाशगंगा पृथ्वीपासून 52 मिलियन प्रकाशवर्ष अंतरावर असून, या आकाशगंगेत 100 अब्जपेक्षा अधिक तारे आहेत. मात्र, शास्त्रज्ञांचे सर्वाधिक लक्ष प्रचंड मोठ्या ब्लॅक होलने खेचले आहे. ब्लॅक होल ही खगोलीय वस्तू असते. याचे गुरुत्वाकर्षण एवढे प्रचंड असते की यातून प्रकाश देखील बाहेर पडू शकत नाही.

शास्त्रज्ञांनी अशाप्रकारच्या प्रचंड मोठ्या ब्लॅक होलचा अंदाज आधीच वर्तवला होता. मात्र, याचे परिणाम व आकार किती मोठा असू शकतो, याचा अंदाज वर्तवणे कठीण होते. 1978 मध्ये कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे खगोलशास्त्रज्ञ पीटर यंग आणि त्यांच्या टीमने M87 च्या केंद्रात प्रचंड मोठी गुरुत्वाकर्षण शक्ती असू शकते, असा अंदाज वर्तवला होता. परंतु, त्यावेळी असलेल्या टेलिस्कोपच्यामदतीने याबाबत अचूक माहिती प्राप्त झाली नव्हती.

M87 चे सर्वात मोठे वैशिष्ट्ये याचा ध्रुवीय प्लाझ्मा प्रवाह आहे. हा प्लाझ्मा हजारो प्रकाशवर्षे पसरलेला असून, याला ब्लॅकहोलमधून प्रचंड उर्जा मिळते. या आकाशगंगेच्या केंद्रबिंदूमधून एक्स-रे आणि रेडिओ किरणोत्सर्ग देखील उत्सर्जित होतात.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close