सामाजिक

शारदा बोरकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार निरोप समारंभ चंदनखेडा येथे थाटात संपन्न

Spread the love

ग्यानीवंत गेडाम/वरोरा

जिल्हा परिषद चंद्रपूर भद्रावती पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र, चंदनखेडा येथे आरोग्य सहाय्यिका पदावर कार्यरत असलेल्या शारदा रामचंद्र बोरकर यांचा नुकताच प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा च्या वतीने सेवानिवृत्ती सत्कार निरोप समारंभ चंदनखेडा येथे थाटात संपन्न पार पडला. शारदा बोरकर यांनी आरोग्य विभागामध्ये 36 वर्षे प्रदिर्घ काळ सेवा पूर्ण केली.त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने शाल , श्रीफळ , पुष्पगुच्छ , भेटवस्तू व गौरवपत्र शिल्ड देऊन त्यांना गौरवित करून सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या सत्कार समारंभ च्या अध्यक्षस्थानी प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा च्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शाहिन सय्यद तर प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय अधिकारी डॉ.समिक्षा रिंगणे , वैद्यकीय अधिकारी डॉ.देवान्शीश ससाने , डॉ.स्फुर्ती गणवीर , सत्कार मुर्ती सेवानिवृत्त आरोग्य सहाय्यिका शारदा बोरकर , पत्रकार गांधी बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.या वेळी मंचावरील सर्व मान्यवरांनी सत्कार मुर्तीच्या जीवनावर प्रकाश ज्योत टाकला व पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व उपस्थितांना मार्गदर्शन केले.सत्कार समारंभामध्ये सत्काराला उत्तर देताना सत्कार मुर्ती शारदा बोरकर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र चंदनखेडा येथिल अधिकारी व कर्मचाऱ्यांबद्दल कूतज्ञता व्यक्त करून दिलेले प्रेम , मानसन्मान व सेवा कालावधीत केलेले सहकार्य कधीही विसरणार नाही असे भावनिक मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सहाय्यक किशोर पांढरे , प्रास्ताविक आरोग्य सहाय्यक अंकुश पंडिले ,तर आभारप्रदर्शन आरोग्य सेवक अनिल पहापडे यांनी केले . कार्यक्रमाला सामुदायिक आरोग्य अधिकारी , आरोग्य सेवक , आरोग्य सेविका , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर , आरोग्य सेविका मदतनीस ,गटप्रवर्तक इत्यादी कर्मचारी वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी चंदनखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close