पीक विमा कंपनीने चालवली शेतकऱ्यांची थट्टा
एक महिना रिप रिप पाऊस होऊनही पिकांचे दाखविले ५% नुकसान*
*शेतकऱ्यांनमध्ये पीक विमा कंपनी बद्दल रोष*
नांदगांव खंडेश्वर/ संदीप अंबोरे
तालुक्यात महिना भरापासून सततचा रिप रिप पाऊस ढगाळ वातावरण व सूर्यप्रकाशाचा अभावाने खरिपाच्या पिकांची वाढ खुंटली व पिके पिवळी पडली आहे अश्यात पीक विमा कंपनीने सर्वेक्षणात फक्त ५% ते 10% पिकाचे नुकसान दाखऊन शेतकऱ्यांची थट्टा चालविली असून विमा कंपनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचा आरोप शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांनी केला असून शेतकऱ्यांना विमा कंपनी कडून न्याय न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा सुद्धा दिला
तालुक्यात जुलै महिन्या पासून पावसाची रिप रिप सुरू आहे सततच्या पावसामुळे फवारणी डवरणी निंदन न चालल्यामुळे पिकापेक्षा तण जास्त वाढले आहे अशात शेतात पाणीच पाणी साचल्याने तूर कपाशीचे व सोयाबीन पिके पिवळी पडून काही शेतातील पिके जास्त पावसाने सुखली आहे शेतकऱ्यांनि विमा कंपनीकडे तक्रारी केल्या विमा कंपनीचे प्रतिनिधी सर्वेक्षणात ५%, १०% नुकसान दाखवत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनमध्ये विमा कंपनी बद्दल प्रचंड रोष वाढला आहे तेव्हा शिवसेनेचे प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनि तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे तक्रारी करून पुनर सर्वेक्षण करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला यावेळी प्रफुल धाये निलेश हिरोडे पवन हिरोडे अमोल लळे वैभव धाये राहुल माहुलकर गोपाल हिरोडे अश्विन लोणकर आकाश हिरोडे इत्यादी शेतकरी उपस्थित होते
सतत एक महिना पाऊस पडल्याने पिकांची वाढ खुंटली तसेच पिके सुध्दा पिवळी पडल्याने सोयाबीन पिकाचे उत्पादन घटले आहे त्यात विमा कंपनी सर्वेक्षणात ५% नुकसान दाखवत आमच्या जखमेवर मिठ चोळत आहे तरी पुन्हा सर्वेक्षण करण्यात यावे
*निलेश हिरोडेशे
तकरी वाटपुर
*रिप रिप पावसाने फवारणी झाली नाही त्यामुळे अति पावसामुळे कपाशी तूर सुकून जात आहे त्यामुळे प्रचंड नुकसान झाले असतांना विमा कंपनी फक्त १०% नुकसान दाखवत आहे हा एक प्रकारचा अन्याय आहे*
मधुकर हिरोडे
शेतकरी वाटपुर