शैक्षणिक
ॲथलेटिक्स स्पर्धेत शांतिनिकेतन अव्वल .
मोर्शी / ओंकार काळे
येथील तालुका क्रीडा संकुल मध्ये दिनांक 23/09/2024 रोजी पार पडलेल्या ॲथलेटिक्स स्पर्धेत शहरातील नामांकित शाळा शांतिनिकेतन येथील तब्बल चार विद्यार्थ्यांची जिल्हास्तरावर निवड झाली आहे .कुअरिबा महेक शेख इयत्ता 7 वी ची विद्यार्थिनी गोळा फेक या क्रीडा प्रकारात तालुक्यातून प्रथम क्रमांक पटकविला त्याचप्रमाणे नैतिक मनोज भोकरे इयत्ता 8 वी हा थालीफेक या क्रीडा प्रकारात तालुक्यातून दुसरा आला आणि संस्कृती राजेंद्र सोनवणे ही 200 मीटर रनिंग मध्ये तालुक्यातून दुसरी आणि त्याच प्रमाणे मयंक सचिन बरगट इयत्ता 9 वी चा विद्यार्थी हा लांब उडी या क्रीडा प्रकारात तालुक्यातून दुसरा आला .या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक अमोल चौधरी व शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले आहे .
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1