क्राइम

शैलजा दराडे यांना न्यायालया कडून दिलासा नाही 

Spread the love

पुणे / नवप्रहार मीडिया

                       नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने 44 लोकांची तब्बल 5 कोटींची फसवणूक करणाऱ्या शैलजा दराडे यांना जमीन देण्यास कोर्टाने नकार दर्शविला आहे. सरकारी वकिलांनी त्यांच्या जामीन अर्जाला विरोध दर्शविला आहे. याबाबत पोपट सुखदेव सूर्यवंशी यांनी फिर्याद दिली होती.

आरोपीने केलेला गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. सध्यस्थितीत या प्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यांना जामीन मंजूर झाल्यास तपास कार्यात अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे त्यांचा जामीन मंजूर करण्यात येऊ नये, अशी विनंती सरकारी वकिलांनी युक्तिवादात केली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जामीन अर्ज फेटाळून लावला.

या प्रकरणातील फिर्यादी सूर्यवंशी हे शिक्षक असून, त्यांच्या नात्यातील महिलेला शिक्षक म्हणून नोकरी हवी होती. त्याची माहिती घेत असताना जून 2019 मध्ये सूर्यवंशी यांची भेट दादासाहेब दराडे याच्याशी झाली. त्याने आपली बहीण शैलजा दराडे शिक्षण विभागात अधिकारी असल्याचे सांगून मी तुमच्या दोन नातेवाईक महिलांना शिक्षक पदावर नोकरीस लावतो असे सांगितले. याबदल्यात त्यांच्याकडून हडपसरमध्ये 27 लाख रुपये घेतले. काही महिने उलटल्यानंतरही नातेवाईक महिलांना नोकरी न लावल्याने सूर्यवंशी यांनी पैसे मागितले. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार केला. त्यानंतर, दराडे यांनी विविध शासकीय विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून 44 जणांची पाच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात उघडकीस आले होते.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close