शासकीय विश्रामगृह येथे शाहु महारज जयंती साजरी
आकोट:- स्थानिक विश्राम गृह येथे आकोट ता प्रतिष्ठीत कलावंता कडून भारतीय समाज सुधारक शाहु महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली .
सविस्तर असे की सामाजिक न्यायाची शिकवण देत न्यायाची क्रांती करणारे भारतीय समाज सुधारक यांची जयंती निमित्त शासकीय विश्राम गृह येथे प्रतिष्ठीत कलावंत आकोला जिल्ह्याची बैठक घेण्यात आली या आधीच्या कार्य करिणी ला तिन वर्ष पूर्ण होऊन ति बरखास्त करण्यात आली आधी चे केलेले कार्य पाहून संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी अवचार साहेब यांनी सदस्यांची वरच्या पदावर नियुक्ती करण्यात आली त्यामध्ये विभागीय अध्यक्ष श्री राजकुमार भगत, जिल्हा अध्यक्ष श्री विजय जितकर, तालुका अध्यक्ष कांचन ताई पंत, उपाध्यक्ष ह भ प वासुदेव महाराज अस्वार , सचिव श्रीकृष्ण चवरे व इतर सदस्यांची निवड करण्यात आली . सर्व प्रथम शाहु महारज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला त्यानंतर संस्थापक अध्यक्ष यांनी कलावंता करिता विविध मागण्यासाठी आंदोलन केले तसेच नागपुर ला रितसर परवानगी घेऊन अधिवेशन माध्ये निवेदन दिलो व त्यापैकी तिन मागण्या शासनाने मान्यही केल्या . एप्रिल महिन्या पासून ५००० रु सरसगट करण्यात आले आणि कलावंतांना मिळाले अशा या निस्वार्थी समाज सेवक मा श्री प्रकाश भाऊ अवचार साहेब यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला . सत्कार मुर्तींनी . एवढ साध्य करण्या करिता केलेले कष्ट त्यांच्या विचारां मधुन कलावंतांना सांगितले . तसेच विजय जितकर यांनी शाहुमहाराज यांच्यावर विचार मांडले . व्यासपिठावर अध्यक्ष स्थानी प्रकाश भाऊ अवचार, राजकुमार भगत , विजय जितकर, भिकाजी भारती, श्रीकृष्ण चवरे , लोखंडे होते . प्रास्तावीक राजकुमार भगत यांनी तर संचलन कांचनताई पंत यांनी केले कार्यक्रमा करिता श्रीकृष्ण केदार, लक्ष्मण रंदे, रामचंद्र केदार , रेखाताई धुर्वे, चंद्रकलाबाई कावरे , अंजनाबाई दुधे, लक्ष्मी बाई राऊत , सुखदेव राव ताडे, इतर कलावंत उपस्थित होते