सामाजिक

नांदेडच्या साहित्यिका सौ. अंजली मुनेश्वर व सौ.रुचिरा बेटकर यांना, शब्दकुंज प्रेरणा पुरस्कार जाहीर.

Spread the love

 

नांदेड( प्रतिनिधी):
१९ वे राज्यस्तरीय ग्रामीण मराठी साहित्य संमेलन कोल्हापूर येथे येत्या २९ सप्टेंबर रोजी होणार असून या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या मान्यवरांना ‘शब्द कुंज प्रेरणा पुरस्कार’ देण्यात येणार आहे.या सोहळ्यात नांदेड जिल्ह्याच्या साहित्यिक शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या सौ. अंजली कानिंदे मुनेश्वर आणि सौ.रुचिरा बेटकर यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात झाली असून, येत्या २९ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितत सन्मानित करण्यात येत आहे. संमेलनाचे अध्यक्ष स्थान प्रा .पी .एस .पाटील तारळे खुर्द (राधानगरी) हे भूषवणार आहेत तर उद्घाटन कवी डॉ रामचंद्र गोविंद चोथे (अकिवाट) यांच्या शुभ-हस्ते होणार असून प्रमुख पाहुणे म्हणून मा.साहेबराव बळीराम खरे परिमंडळ वन अधिकारी ठाणे,मुंबई यांची उपस्थिती लाभणार आहे.प्रमुख उपस्थितीमध्ये कवी अशोक मोहिते, भाऊसाहेब कांबळे ममदापूर, आणि चित्रपट टिव्ही नाट्य अभिनेते सुशिल डवर कुडाळ यांच्यासह कविसंमेलन अध्यक्ष कवी दादासाहेब शेख रत्नागिरी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.संमेलनाचे आयोजक कवी सरकार इंगळी असून सुत्रसंचलन सौ अर्पणा भंडारी कोल्हापूर हे करणारं आहेत. दरम्यान कोल्हापूर, सोलापूर ,नांदेड, बार्शी, मुंबई, ठाणे, सांगली ,
धाराशीव इत्यादी अन्य ठिकाणावरून पुरस्कार प्राप्त मान्यवर आणि कवी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close