क्राइम

भावी पती सोबत फिरत असलेल्या तरुणीवर लैंगिक अत्याचार

Spread the love

जालना  / क्राईम रिपोर्टर 

                     भावी पतीला धमकावून तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची संतापजनक घटना जालना रेल्वे स्टेशन परिसरात घडली आहे. तरुणी डबा देण्यासाठी  आली होती. तर तरुण (भावी पती) स्टेशन वर थांबला होता. ते दोघे घरी परत जात असताना आरोपीने त्यांना थांबवले. भावी पतीला धमकावून जागीच थांबायला सांगून तरुणीला भुयारी पुला जवळील अंधारात नेऊन लैंगिक अत्याचार केला आणि पळून गेला. 

नेमकं काय घडलं?
बुधवारी रात्री होणारा पती जालना रेल्वे स्थानक परिसरात थांबला होता. त्याची होणारी पत्नी डबा देण्यासाठी तिथे आली होती. रात्री नऊच्या सुमारास दोघंही पायी चालत घरी परत चालले होते. दरम्यान, तरुणीच्या ओळखीचा प्रेम रवी पाचगे त्याठिकाणी आला. त्याने जोडप्याला अडवलं. मला तुझ्याशी बोलायचं आहे, असं म्हणत तरुणीचा हात धरून तिला अंधारात घेऊन गेला. तसेच जागेवरून हलला तर जीवे मारेन, अशी धमकी आरोपीनं होणाऱ्या पतीला दिली.

यानंतर आरोपीनं पीडित तरुणीला भुयारी पुलाजवळ असलेल्या नाल्यात घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. अत्याचारानंतर आरोपी घटनास्थळावरून पळून गेला. आरोपीच्या तावडीतून सुटका झाल्यानंतर दोघांनी कदीम जालना पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने घटनास्थळी दाखल झाले आणि तपासाची चक्र फिरवली.

बुधवारी रात्री नऊ वाजता ही घटना घडल्यानंतर कदीम जालना पोलिसांनी अवघ्या ४ तासांत नराधम आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. तसेच पीडित तरुणीची वैद्यकीय चाचणी करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयात हजर केलं असता, न्यायालयाने आरोपीला २९ डिसेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close