न.प. घाटंजी डंपिंग यार्ड मधील कचरा गाडीतील सात स्टेपनी व तिनं बॅटऱ्या चोरी.
न.प. मालमत्ता ची चोरी बाबत पोलिसी नोंद देतांना साहित्याचा उल्लेखचं नाही .
कचरा टेंडर संपला त्याच दिवसी चोरी हा योगायोग की, गौडबंगाल.
घाटंजी तालुका प्रतिनिधी-सचिन कर्णेवार
घाटंजी न.प. मधिल 2023 वर्षाच्या शेवटच्या महिन्याचे सूरवातीला रात्री कचरा डंपिंग यार्ड मधून कचरा गाडी टाटा एस मोटार चे सात स्टेपनी आणि तिनं बॅटऱ्या,टायर चोरीस गेल्याची घटना होऊनही न.प.अधिकारी या प्रकरणात गांभिर्याने लक्ष पुरवत नसल्याचे दिसून येते असे प्रहार जनशक्ती पार्टी चे सामाजिक कार्यकर्ते सुरज हेमके चे न.प. ला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. विशेष म्हणजे चोरीची घटना घडली त्याच दिवशी कचरा टेंडर संपल्याचे ही कळते.एवढचं नाही तर या घटनेची माहिती न.प. आतल्या गोटातून कळली असून या घटनेची माहिती पोलिस दप्तरी करण्यास गेलेल्या न.प. मार्फत तक्रारीत कुठले साहित्य चोरी गेले याचा उल्लेखच स्पष्ट नसल्याने अधिकारी वर्गास साधं तक्रार ही करण्या इतपत ज्ञान नाही काॽ. हे समजण्या पलिकडचे आहे.एंन टेंडर संपल्याचे दिवसि स्टेपणी व बॅटरी चोरी जाणे म्हणजे निव्वळ योगायोग की गौडबंगाल?.हे जनतेच्या बोलण्यातून येत आहे. एवढी घटना घडून ही मुख्याधिकारी वा संमंधीत अधिकारी गांभिर्याने दखल घेत नाही यामागील रहस्य कायॽ हे ही पाहण्या सारखे आहे.
000000000