सेतु सुविधा केंद्र चालकांकडुन प्रमाणपत्रांसाठी नागरीकांची आर्थिक लुट…
बिलोली (प्रतिनिधी)-
शासकीय आणि शैक्षणिक कामासाठी अत्यावश्यक असणाऱ्या उत्पन्नाचे , रहिवासी , नॉन क्रिमेलीयर जात प्रमापत्र आधार अपडेट या सन्य अन्य प्रमाणपत्राच्या आॕनलाईन कामासाठी सेतु सुविधा केंद्र चालकाकडुन प्रमाणपत्रासाठी लागणाऱ्या ठरावीक ३४₹ च्या दरापेक्षा अधिकचे पैसे घेवुन आर्थिक लुट केली जात असल्याची ओरड शाळेय विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरीकांतुन होत आहे.
विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच शासनाच्या विविध योजनेचे लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना लागनारे उत्तपन्नाचे, रहिवासी, नॉन क्रिमेलीयर , जातीचे प्रमाणपत्र इत्यादी शासकीय प्रमाणपत्रराच्या आॕनलाईन कामासाठी ठरावीक दरापेक्षा अधिकचे रुपये सेतु सुविधा केंद्र चालकांकडुन घेतले जात आहेत. उत्पनाचा दाखला आणि रहिवासी प्रमाणपत्रासाठी काढण्यासाठी शासकीय दर ३४ रु.असतांना सेतु केंद्र चालक मात्र १०० रु आॕनलाईन करण्यासाठी घेतात आधार कार्ड अपडेट साठी १५०₹ घेतले जात आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एन.आय.सी.अंतर्गत चालनाऱ्या सेतु सुविधा केंद्र चालकाच्या मनमानी कारभारावर प्रशासनाचे नियंत्रण नसल्यामुळे शासकीय प्रमाणपत्रासाठी जास्तीचे पैसे घेवुन जनतेची लुट केली जात आहे.
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना” शासनाच्यावतीने नुकतीच सुरु केली आहे. या योजनेत अर्ज करताना नागरिकांना विविध प्रमाणपत्राची आवश्यकता भासणार आहे. ही प्रमाणपत्र, दाखले काढण्यासाठी नागरिकांनी नजीकच्या आपले सरकार सेवा केंद्रावर जावून अर्ज करुन काढून घ्यावेत. ही प्रमाणपत्र काढण्यासाठी सेतू केंद्र चालकांनी निर्धारित सेवा शुल्का व्यतिरिक्त इतर कोणतेही शुल्क आकारल्यास नागरिकांनी संबंधित तहसिलदाराकडे लेखी स्वरुपात तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले आहे.