सामाजिक

जेष्ठ साहित्यिक धनंजय मुळे यांना ‘साहित्य भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले..

Spread the love

लाखांदूर तालुका प्रतिनिधी नरेश गजभिये

लाखांदूर तालुक्यातील जेष् साहित्यिक तथा सेवानिवृत्त शिक्षक जेष्ठ कवी धनंजय मुळे यांना साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले…
जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ नागपूर च्या वतीने विदर्भ साहित्य संमेलन मधुरम सभागृहात येथे जागतिक आंबेडकरवादी साहित्य महामंडळ यांच्या नवव्या वर्धापनदिनी सन्मान करण्यात आला. थोर प्रसिद्ध साहित्यिक तथा अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. या प्रसंगी महामंडळाचे अध्यक्ष प्रा. दीपक खोब्रागडे, डॉ. के. पी. वासनिक दिल्ली, मल्लेश चौगुले बेळगाव, डॉ. जगन कराडे कोल्हापूर, मधुकर वानखेडे दिल्ली यांच्या उपस्थितीत झाला.
कवी धनंजय मुळे हे साहित्य व सामाजिक क्षेत्रात विस ते पंचवीस वर्षापासून कार्यरत आहेत त्यांचे दोन कविता संग्रह प्रकाशित झालेले आहेत ‘सज्ज झालेच पाहिजे व खरा राष्ट्र धर्म शाळा. त्यांनी अनेक नवोदित कविंच्या कलाकृतींचे परिक्षण केले असून प्रस्तावना लिहिली आहे. त्याच प्रमाणे तिन एकांकिका हि लिहिले आहे व त्याचे अनेक प्रयोग शाळास्तरावर झाले आहे. त्यांच्या साहित्य सेवेची फलित म्हणून’ साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांचे सर्व परिसरात साहित्य प्रेमी यांनी अभिनंदन व शुभेच्छा दिलेल्या आहेत..

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close