श्री दत्त मंदिर उत्सव समितीच्या वतीने आजपासून श्री शिवमहापुराण कथा ….

पंडित सुरज शर्मा यांच्या वाणीतून कथा वाचन…
धामणगाव रेल्वे,
श्री दत्त जन्मोत्सव निमित्याने श्री दत्त मंदिर उत्सव समिती च्या वतीने येथील श्री दत्त मंदिर येथे श्री शिव महापुराण कथेचे आयोजन करण्यात आले आहे कथावाचक पंडित सूरज शर्मा, महाकालेश्वर धाम उज्जैन यांच्या सुमधुर वाणी मधून श्रीमद् भागवत कथा ज्ञान यज्ञाचे आयोजन दिनांक २१ डिसेंबर २०२३ ते २५ डिसेंबर पर्यंत करण्यात आले असून श्री दत्त जयंती उत्सव २० डिसेंबर पासून श्री दत्त पारायणाने प्रारंभ झाले आहे
अमर शहिद भगतसिंग चौकातील प्राचीन असलेल्या श्री दत्त मंदिर येथे प्रारंभ झालेल्या दत्त जयंती उत्सवामध्ये आज गुरुवार दिनांक २१ डिसेंबरला सकाळी ९ वाजता कलश व शोभा यात्रेचे आयोजन श्री शिव मंदिर सराफ पार्क दत्तापूर ते श्री दत्त मंदिर अमर शहिद भगतसिंग चौक पर्यंत राहणार असून श्री शिवमहापुराण कथा उजैन निवासी महाकालेश्वर धाम उज्जैन येथील पंडित सुरेश शर्मा यांच्या ओजस्वी वाणीतून दररोज दुपारी २ वाजता होईल
२४ डिसेंबरला दुपारी बारा वाजता रुद्राक्षअभिषेक व रुद्राक्ष वितरण होईल तसेच २५ डिसेंबर सोमवारला सकाळी १० ते १२ पर्यंत श्री शिवमहापुराण कथा पूर्णाहूती तसेच दुपारी ४ वाजता श्रीदत्त पालखीची शोभायात्रा व २६ डिसेंबरला श्री दत्त जन्मोत्सव आरती आणि दुपारी ४ वाजता पासू महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे नगरातील भावी भक्त महिला पुरुषांनी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री दत्त मंदिर उत्सव समिती अमर शहिद भगतसिंग चौक धामणगाव रेल्वे ने केले आहे