हटके

सेल्फीचा नादात तो 2 हजार फूट खोल दरीत पडला 

Spread the love

वेळीच मदत मिळाल्याने आणि पोहता येत असल्याने वाचला जीव 

अजंठा / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

                पावसाळा सुरू झाला की अनेक ठिकाणचे निसर्ग सौंदर्य बहरते.नैसर्गिक धबधबा पाहण्याचा मोह लोकांना आवरत नाही . आणि त्यासाठी ते हजरो किमी वरून ते निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी येत  असतात. अश्या ठिकाणी लोकांना फोटो घेण्याचा मोह आवरत नाही. पूर्वी या ठिकाणी फोटोग्राफर असायचे पण अँड्रॉईड मोबाईलमुळे पर्यटक आता स्वतःच फोटो काढतात. मुख्य म्हणजे आपला फोटो चांगला आणि वेगळा यावा यासाठी ते  कुठलीही जोखीम पत्करतात.अशीच जोखीम पत्करणे एक युवकाच्या  अंगलट आले आहे. सेल्फीचा नादात तो 2 हजार फूट खोल दरीत पडला.नशीब बलवत्तर म्हणून त्याला सुखरूप बाहेर काढण्यात आले.

असाच प्रकार अजिंठा लेण्यांच्या परिसरात घडला असून एक तरुण सेल्फीच्या नादात 2 हजार फूट खोल कुंडात पडला.  मिळालेल्या माहितीनुसार, गोपाल पुंडलिक चव्हाण (रा. नांदातांडा, ता. सोयगाव) असे तरुणाचे नाव आहे. रविवारी जळगाव येथील मित्रांसह तो अजिंठा लेणी पाहायला आला होता. लेणी पाहून झाल्यानंतर सेल्फी काढण्यासाठी सप्त कुंड असलेल्या धबधब्याच्यावर गेला. मात्र सेल्फीच्या नादात तो सप्त कुंडात पडला. पोहता येत असल्याने त्याने कड्याकपारींचा आधार घेतला.

तरुण सप्त कुंडात पडल्याची माहिती मिळताच पोलीस आणि पुरातत्व विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एक दोरखंड खाली सोडण्यात आला आणि त्याला वर काढण्यात आले. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close