निवड / नियुक्ती / सुयश

तिसरे राज्यस्तरीय शिव बाल, किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन विशेषांकाच्या सहसंपादक पदी डॉ.अशोक शिरसाट यांची निवड

Spread the love

बुलढाणा / प्रतिनिधी

मूळचे अकोला जिल्हयातील देगांव येथील सुप्रसिद्ध साहित्यिक तथा शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे राज्य सहसचिव डॉ.अशोक शिरसाट यांची नुकतीच तिसऱ्या राज्यस्तरीय शिव बाल ,किशोर व युवा मराठी साहित्य संमेलनाच्या विशेषांकांच्या सहसंपादक पदी निवड करण्यांत आली आहे. येत्या १४ डिसेंबर २०२४ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांची आळंदी येथे शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन , मुक्ताईनगर ( जळगांव खान्देश ) च्या विद्यमाने आयोजित तिसरे राज्यस्तरीय शिव बाल , किशोर व युवा मराठी साहित्य संमेलन होवू घातले आहे. या साहित्य संमेलनाची स्मरणिका /विशेषकांचे आयोजन व प्रकाशन समारंभ मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. त्याकरिता संपादक पदी प्रा.डॉ. मंदाताई नांदुरकर, अमरावती व सहसंपादक पदी जेष्ठ साहित्यिक डॉ.अशोक शिरसाट ,अकोला यांची फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर , मुक्ताईनगर यांनी नुकत्याच घेण्यांत आलेल्या महत्वपूर्ण सभेच्या एका झूम मिटींगद्वारे निवड केली आहे. सहसंपादक पदी निवड केल्याबद्दल डॉ. शिरसाट यांनी शिवचरण उज्जैनकर सरांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत .

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close