सामाजिक

आरोग्य विषयक रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Spread the love

 

मंगरूळ दस्तगीर ::महाराष्ट्र सोशल फोरम महाराष्ट्र राज्य व प्राथमिक आरोग्य केंद्र मंगरूळ दस्तगीर, यांचे संयुक्त विद्यमाने स्पर्श जनजागृती अभियान 2024 अंतर्गत भव्य रांगोळी स्पर्धेचे आयोजन नुकतेच प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये पार पडले.
सदर रांगोळी स्पर्धेमध्ये कुष्ठरोग,क्षयरोग, मलेरिया, कोरोना,हार्ट अटॅक,व्यसन अशा विविध विषयावर स्पर्धकांनी अभ्यासपूर्ण रांगोळ्या रेखाटल्या. सदर स्पर्धेमध्ये गावातील गृहिणी व विद्यार्थि विद्यार्थिनींनी उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदविला.
रांगोळी स्पर्धेचे परीक्षण एपीआय सुलभा राऊत , सामाजिक न्याय विभागांतर्गत सरोज आवारे समतादूत व ज्ञानदीप स्कूलच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री मात्रे यांनी केले.स्पर्धेचे वितरण लवकरच करण्यात येईल, असे महाराष्ट्र सोशल फोरम चे संस्थापक अध्यक्ष तथा आरोग्य निरीक्षक धर्मा वानखडे यांनी सांगितले. या कार्यक्रमाकरिता डॉ.प्रफुल्ल मरसकोले डॉ. वीरेंद्र नारनवरे, प्रमोद टेंबरे, गजानन सोनोने, संजय ठाकरे, संचाली दानवे, संचिता बढीये,विनोद मेंढे यांनी अथक परिश्रम घेतले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close