शाशकीय

जीवन प्राधिकरणावरील जप्ती टळली.

Spread the love

.
चापडोहा भूसंपादन मोबदला प्रकरण..
यवतमाळ वार्ता
अरविंद वानखेडे
शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या चापडोह धरण प्रकल्पासाठी संपादीत केलेल्या शेतजमिनीचा ४७ लाख ३२ हजार ३५८ मोबदला न्यायालयाच्या आदेशानंतरही मिळाला नाही.त्यामुळे मंगळवार (दि १६) रोजी शेतकऱ्यानी न्यायालयाच्या आदेशाने जीवन प्राधिकरण कार्यालयातील जप्ती आणली. मात्र कार्यकारी अभियंता यांनी वकीलांशी चर्चा करून मुदत मागितल्याने जप्तीची नामुष्की टळली.
उदयसिंग हरदेव राठोड रा. रामनगर ता.जि यवतमाळ यांची चापडोह धरण प्रकल्पासाठी २००८ मध्ये शेतजमिन जिवन प्राधिकरण कार्यालयाने संपादित केली होती. या शेतजमिनाचा मोबदला एकूण ४७ लाख ३३ हजार ३५८ इतका होता. मोबदला मिळत नसल्याने लाभार्थ्याने नागपूरच्या दिवाणी न्यायालयात धाव घेत न्यायाची मागणी केली. दिनांक २६ मार्च २०२१ रोजी पीटासन अधिकारी भुमिसंपादन पुनस्थापना आणि पुनवर्सन प्राधिकरण नागपुर न्यायालयाने समस देवून सदर जमिनाचा मोबदला उदयसिंग यांना देण्यात यावा असे आदेशित केले. तसेच मोबदाला न मिळाल्यास सदर रक्कमेची जंगम मालमत्ता जप्त करावी असे म्हटले होते. परंतू त्यानंतर अनेक वेळी मुदतवाढ होवूनही उदयसिंग यांना मोबदला देण्यात आला नाही. त्यानुषंगाने मंगळवारी उदयसिंग यांनी येथील दिवाणी न्यायालयातून मोबदल्यासाठी जीवन प्राधिकरण कार्यालयावर जप्तीचे आदेश आणले. त्यानंतर लाभार्थीनी मजिप्रा कार्यालयावर धडक देवून जप्ती आणली. परंतू जीवन प्राधिकरण कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चाअंती मुदतवाढ मागितल्याने जप्तीची नामुष्की टळली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close