हटके

सीमा हैदर नंतर आणखी एक विदेशी महिला भारतीयाच्या प्रेमात 

Spread the love

हजारीबाग / नवप्रहार मीडिया नेटवर्क 

               विदेशी महिलांचे भारतीयांच्या प्रेमात पडण्याच्या प्रकरणात बरीच वाढ झाल्याचे दिसून येत आहे. सीमा हैदर चे प्रकरण ताजे असतांनाच एका पोलिश महिलेचे भारतीय तरुणाच्या प्रेमात पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. ही महिला घटस्फोटित असून तिला सहा वर्षाची मुलगी आहे.

झारखंडमधून असेच आणखी एक प्रकरण समोर आले आहे. येथे हजारीबागमधील एका तरुणाचे तिच्या सहा वर्षांच्या मुलीसह आपल्या गावी पोहोचलेल्या पोलिश महिलेवर प्रेम आहे.

शादाबशी इंस्टाग्रामच्या माध्यमातून ती जोडली गेली होती. आम्ही हळू हळू बोलू लागलो आणि कधी प्रेमात पडलो ते कळलंच नाही. आता या ४९ वर्षीय महिलेला शादाबशी लग्न करायचे आहे, म्हणून ती भारतात आली आहे. ती म्हणते की तिला शादाब आणि त्याचे गाव खूप आवडते आणि आता तिला शादाबसोबत राहायचे आहे असं पोलंड निवासी बार्बराचं म्हणणं आहे.

लॉकडाऊनमध्ये सुरू झाला संवाद

शादाबचे म्हणणे आहे की, लॉकडाऊन दरम्यान त्याचे युरोपमधील पोलंडमधील रहिवासी बार्बरा पोलॉकशी संभाषण झाले. हळूहळू मैत्री झाली आणि आता प्रेम. तो सांगतो की, लवकरच आम्हा दोघांना लग्न करायचे आहे. भारतातील वातावरण खूप उष्ण आहे, त्यामुळे शादाबने बार्बरासाठी दोन एसी लावले आहेत आणि तिच्यासाठी एक रंगीत टीव्ही देखील खरेदी केला आहे.

बार्बराचा झालाय घटस्फोट

बार्बरा म्हणते की, शादाब खूप गोड माणूस आहे आणि ती त्याच्यासोबत खूप आनंदी आहे. दोघांनाही एकत्र राहायचे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बार्बरा विवाहित असून तिचा घटस्फोटही झाला आहे. तिला तिच्या पहिल्या लग्नापासून एक सहा वर्षांची मुलगी आहे, जी शादाबला बाबा म्हणून हाक मारते. बार्बरा सध्या शादाबच्या कुटुंबाशी समेट घडवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळेच त्यांनी घरातील कामातही मदत करायला सुरुवात केली आहे. दुसरीकडे, ही बाब कळताच स्थानिक पोलीसही शादाबच्या घरी पोहोचले. त्यांनी बार्बराचा पासपोर्ट आणि व्हिसा तपासला आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
2
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close