क्राइम

… अन त्यांना समोर पाहून त्याने हातातील नोटा गिळण्याचा केला प्रयत्न 

Spread the love

… 

बीड / नवप्रहार डेस्क

                      प्रतिबंधात्मक कारवाई टाळण्यासाठी लाच मागणारा पोलीस हवालदार एसीबी च्या जाळ्यात सापडला आहे.मुख्य म्हणजे त्याने  लाचेची रक्कम तोंडात टाकून ती चावण्याचा आणि गिळण्याचा प्रयत्न केला. पण एसीबी च्या पथकाने वेळीच त्याला पकडून त्याच्या तोंडातून ती रक्कम हस्तगत केली. मारूती रघुनाथ केदार (वय 34) असे त्याचे नाव आहे.

यानंतर त्याचं नाक दाबून तोंड उघडण्यात आलं आणि त्याच्या तोंडातून 5 हजार रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.

शेतीच्या वादातून झालेल्या भांडणामध्ये चकलांबा पोलीस ठाण्यात परस्पर तक्रारीवरुन अदखलपात्र गुन्हे नोंद आहेत. यात प्रतिबंधात्मक कारवाई न कऱण्यासाठी ही लाच घेण्यात आली होती. तक्रारदार आणि त्याचे चुलते यांच्यात शेतीचा वाद आहे. यात प्रतिबंधक कारवाईत मदत करण्यासाठी ही लाच घेतली होती. मंगळवारी संबंधिताने याबाबत छत्रपती संभाजीनगरच्या पथकाकडे तक्रार केली.

यानंतर पथकाने लाच घेताच केदार याला अटक केली आहे. तक्रारदार हा दिव्यांग असतानाही त्याला वारंवार पोलीस ठाण्यात बोलावून मारूती केदार याने त्रास दिल्याचाही आरोप आहे. केदार हा तक्रारदाराला सांगायचा की तुझा जामीन तहसीलदाराकडे करायचा आहे. त्यासाठी पैसे लागतील. त्यांनी जामीन नाकारल्यास जेलमध्ये जावं लागेल, असं धमकी केदार द्यायचा. याच त्रासाला कंटाळून तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार केली. या प्रकरणी आता हलावदारावर कारवाई करण्यात आली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close