Uncategorized

प्रहरच्या जनशक्ती पॅनलचे प्रचार नारळ फुटले

Spread the love

दिग्गजांची चिंता वाढणार

रक्तदान रुग्णसेवेमुळे जनशक्ती पॅनल ची Brown

धामणगाव रेल्वे :- येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतील प्रहार पक्षाच्या जनशक्ती पॅनलचे प्रचार नारळ फोडण्यात आले असून प्रहार चे जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे यांच्या नेतृत्वात निवडणूक रिंगणात उभ्या असलेल्या तीन उमेदवारांनी आपल्या निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस व भाजप या दोन्ही पक्षाच्या मोठ्या गटांच्या उमेदवारांच्या भूमिका स्पष्ट झाल्या नसल्या तरी या निवडणुकीत तिसऱ्या पर्यायाच्या रूपाने प्रहार जनशक्ती पक्षाचे तीन उमेदवार निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटातून पराग रमेशराव राऊत व मंगेश प्रभाकर डाफ यांची  तर अनुसूचित जाती जमाती गटातून सौ.सुजाता प्रवीण हेंडवे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.दरम्यान मंगळवारी १० फेब्रुवारी रोजी श्री क्षेत्र आष्टा येथील भिकाजी महाराज मंदिरात त्यांच्या जनशक्ती पॅनलच्या प्रचाराचे नारळ फोडण्यात आले.
जळका पटाचे येथील सरपंच पराग रमेशराव राऊत यांना इतरही राजकीय पक्षा नी उमेदवारी देण्याची इच्छा दाखवली असताही त्यांनी प्रहार पक्षाच्या वतीने उमेदवारी दाखल केली ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे,
काही दिवसांपूर्वी रेस्ट हाऊस मध्ये संबंधित APMC निवडणुकीत तिसरा पर्याय देन्याच्या दृष्टीने झालेल्या मीटिंग ची चर्चा आधीच राजकीय क्षेत्रात होती.
प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण हेंडवे यांनी सहकारातील बाजार समिती निवडणुकीत उडी घेतल्याने दिगजांची चिंता वाढली आहे. समाजकार्यात अग्रेसर असलेल्या प्रवीण हेंडवे यांनी रुग्णसेवा,रक्तदान व अनेक युवकांना सार्वजनिक कामात मदत केल्याने हेंडवे यांच्या जनशक्ती पँनलची सकारात्मक चर्चा सहकार वर्तुळात सुरू झाली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close