हटके

त्याचा ‘ जुगाड ‘ पाहून जनतेकडून होतेय त्याची स्तुती

Spread the love

त्याचा ‘ जुगाड ‘ पाहून जनतेकडून होतेय त्याची स्तुती

        सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यापैकी मोजके व्हिडीओ असे असतात की जनतेकडून त्यांच्या कार्याचे कौतुक होते. साधारण व्यक्ती नव्हे तर यंत्र निर्माता आणि उद्योगपती देखील त्यांचा भन्नाट जुगाड पाहून अचंभीत होतात. आणि त्याचे कौतुक करतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक ‘ भन्नाट जुगाड ‘ वाला व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात या व्यक्तीने जे केले ते पाहून नेटकरी त्यावर जबरदस्त प्रतिक्रिया देत आहेत.

व्हिडीओमध्ये चारचाकी गाडीचा अ‍ॅक्सेलेरेटर दुचाकीला लावण्याचा भन्नाट जुगाड एका तरुणाने केला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल होण्याचं कारण म्हणजे तरूणाची अनोखी कल्पना. त्यामुळेच हा व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरला आहे. विशेष बाब म्हणजे दुचाकीवर पाय ठेवण्याच्या स्टँडवर या तरूणाने अ‍ॅक्सेलेरेटर बसवला आहे. त्यामुळे या दुचाकीचा फायदा दिव्यांग व्यक्तीलादेखील होऊ शकतो. असं नेटकऱ्यांचं म्हणणं आहे.

साधारणत: १६ नोव्हेंबरला हा व्हिडीओ शेअर करण्यात आला. इंस्टाग्रामवरील एका यूजरने हा व्हिडीओ शेअर केल्याची माहिती मिळते आहे. नेटकऱ्यांनी तरुणाच्या या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. आतापर्यंत ५ कोटींहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.

 

 

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close