हटके

जबरदस्ती लग्न करून धर्मपरिवर्तन करणाऱ्या तरुणीची घरवापसी

Spread the love

मुंबई / नवप्रहार वृत्तसेवा

                   फेसबुक वर दोस्ती झाल्याने त्याने तरुणीला मित्राच्या घरी बोलावंले.तिथे तिला शीतपेय आणि बिर्याणी खाऊ घातली. दुसऱ्या दिवशी तिला जेव्हा जाग आली तेव्हा तिचे शरीर दुखत होते. तिने त्याला तिला घरी सोडण्यास सांगितले. दोन – तीन दिवसानंतर तो तिच्या घरी आला आणि तिला तिचे विवस्त्र फोटो दाखवून तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केली.त्यानंतर जून महिन्यात लग्न करून 100 रु च्या स्टॅम्प पेपर वर सही घेतली. त्यानंतर  एक महिन्याने त्याने कुवेत च्या मुस्लिम मुलीशी लग्न केले. दरम्यान तिला त्याच्या कडून आणि कुटुंबिया कडून मारहाण होत होती. आणि त्रास दिला जात होता. तिने कशीबशी स्वतःची सुटका करून घेत मुंबई गाठली आणि घडलेला प्रकार कथन केला.

दादर येथील कालिकामाता मंदिरात मनसेचे उपाध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्या मुलीची ब्राम्हणाकडून विधिवत पूजा करण्यात आली.

फेसबुकच्या माध्यमातून जानेवारी 2022 मध्ये सदर इसमाशी ओळख झाली ओळखीचे रूपांतर मैत्रित झाले. एके दिवशी तो इसम मुंबईत भेटायला आला व माझा वाढदिवस आहे, असे सांगत मला रोहा इथे त्याच्या मित्राच्या घरी घेऊन गेला तिथे केक, बिर्याणी व शीतपेय पिण्यास दिले, अशी माहिती त्या मुलीनी दिली. दुसऱ्या दिवशी जेव्हा मला जाग आली तेव्हा माझे अंग दुखत होते. त्यावेळेस मी त्याला मुंबईला सोडण्यासाठी रेल्वे स्थानकात सोडण्यास सांगितले.

तीन दिवसांनी तो मला माझ्या मुंबईतील घरी भेटण्यास आला आणि मोबाईलवर नग्न अवस्थेत काढलेले फोटो दाखवून ते व्हायरल करीन अशी धमकी देत शरीर संबधाची मागणी केली. त्यानंतर जून महिन्यात लग्न केले आणि मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी काझीकडे नेऊन 100 रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर सही करून घेतल्याचे तिने सांगितले.

महिन्याभरच्या कालावधीनंतर त्याने कुवेतला जाऊन मुस्लिम मुलीशी दुसरा विवाह केला. दरम्यानच्या काळात मला त्याच्या घरच्याकडून खूप साऱ्या छळाला सामोरे जावे लागले. त्यानंतर मी रोहा पोलिस स्थानकात तक्रार नोंदवली व दोन दिवसांकरीत मुंबईला जाते, असे सांगत थेट मुंबई गाठली असे तिने सांगितले.

मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिचे हिंदू धर्मात पुन्हा धर्मांतर करण्यात आले. मात्र लव्ह जिहाद विरोधी कायदा सरकारने काढावा जेणेकरून अशा प्रकारच्या कारवायांना आळा बसू शकेल, असे यशवंत किल्लेदार याचे म्हणणे आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close