शिक्षक मागणीसाठी शाळा व्यवस्थापन समिती व पालकांचे निवेदन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान
सचिन महाजन
हिंगणघाट ग्रामीण प्रतिनिधी
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येरला येथे वर्ग एक ते सात असून एकूण विद्यार्थी 85 आहेत व कार्यरत शिक्षक संख्या तीन आहेत मागील तीन-चार वर्षांपासून गणित व विज्ञान शिक्षकाची जागा रिक्त आहेत वारंवार निवेदन देऊनही शिक्षक दिल्या जात नाही त्यामुळे पालकांमध्ये रोष निर्माण झाला आहे कारण शिक्षक संख्या कमी असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे त्याबाबत पुन्हा शाळा व्यवस्थापन समिती येरला व पालकांकडून मा. सोनवणे मॅडम गटशिक्षणाधिकारी हिंगणघाट यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात आले लवकरात लवकर शिक्षकाची व्यवस्था करावी याबाबत विनंती करण्यात आली जर पंधरा दिवसात शिक्षकाची व्यवस्था न झाल्यास सर्व गावकरी पालक आंदोलन करणार असे सांगितले. निवेदन देते वेळेस शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष जयंत कातरकर सोबत राजू सराटे, सुरज भोसले ,संदीप वाघ, वाल्मीक मेश्राम शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री अनिल खंडाळकर ,अमोल तेलंगे शंकर भोकरे, सुनीता उमाटे, मंगला जोगी ,सीमा टापरे व काही पालक उपस्थित होते