
नांदगाव खंडेश्वर/पवन ठाकरे प्रतिनिधी
नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वेणी गणेशपुर येथे आझादीं का अमृत महोत्सवा निमित्त माझी माती,माझा देश अमृत कलश यात्रा काढण्यात आली यावेळी विविध झाकी साकारण्यात आल्या होत्या आणि गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.त्यामध्ये गावातील सर्व भजनी मंडळ उपस्थित होते गुरुदेव सेवा मंडळ, महादेव मंडळ विठ्ठल रुक्माई मंडळ,मुगसाजी मंडळ,रमाबाई मंडलाच्या महिलांनी भजन गायीले या मिरवणुकी मध्ये जिल्हा परिषद माध्यमिक मराठी शालेचे सर्व कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. या मिरवणुकीमध्ये शिवाजी महाराज यांच्या वेशभूषेत प्रणय गायकवाड डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषेत प्रतीक कांबळे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या वेशभूषेत रूपराव लायबर,सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषेत तुळसाबाई वानखडे,गाडगे महाराज यांच्या वेशभूशेत वैभव जोगे हे होते यावेळी या सर्वांचा सत्कार गट्विकास अधिकारी प्रकाश नाटकर यांचे हस्ते करण्यात आला.सर्व उपस्थितांना गटविकास अधिकारी प्रकाश नाटकर यांनी पंचप्राण शपथ दिली.यावेळी पंचायत समितीचे
विस्तार अधिकारी विठ्ठल जाधव आणि पंचायत समिती,ग्रामपंचायतचे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच गावकरी मंडळी यावेळी उपस्थित होते.