विदेश

त्याचा जुगाड पाहून लोकं आश्चर्याने पाहत राहिले , भरभरून केले कौतुक 

Spread the love

चीन / नवप्रहार डेस्क

              असे कुठलेही क्षेत्र नाही ज्यात समस्या उद्भवत नाही . त्यावर उपाय शोधून जो व्यक्ती पुढे जातो तोच आयुष्यात प्रगती करतो. इतकेच नाही तर पुढे कोणाला तशी समस्या भासल्यास त्याला त्यातून निघण्याचा मार्ग देखील सांगून जातो. एका टेम्पो चालकाने त्याच्या टेम्पो चा टायर पंक्चर झाल्यावर जो जुगाड लावला त्याचे जगभर कौतुक होत आहे.

तर, आज व्हायरल व्हिडीओत असेच काहीसे पाहायला मिळाले आहे. प्रवासादरम्यान टेम्पोचा एक टायर पंक्चर झाला. पण, त्याने या समस्येवर जबरदस्त उपाय शोधून काढला आहे.त्याने चक्क स्केटिंग बोर्डचा उपयोग करून टेम्पो पळवला आहे.

व्हायरल व्हिडीओ चीनचा आहे. एक गाडीचालक स्वतःची गाडी घेऊन प्रवास करीत होता. तेव्हा टेम्पोचालकाच्या एका अजब कृतीने त्याचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या टेम्पोचा एक टायर पंक्चर झाला होता. या परिस्थितीदरम्यान मेकॅनिक वा गॅरेजपर्यंत गाडी कशी घेऊन जायची, असा प्रश्न टेम्पोचालकासमोर होता. पण, त्या परिस्थितीवर उपाय म्हणून त्याने एक जबरदस्त जुगाड केला आहे. चालकाने टेम्पोला एक दोरी बांधली. त्याने नक्की काय केले ते व्हायरल व्हिडीओतून तुम्हीसुद्धा बघा.

व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहिले असेल की, टेम्पोचा एक टायर पंक्चर झालेला असतो. हे पाहता, प्रवासादरम्यान टेम्पोचे संतुलन बिघडू नये म्हणून चालकाने पंक्चर झालेल्या टायरच्या खाली स्केटिंग बोर्ड ठेवला आहे. तसेच या स्केटिंग बोर्डला दोरी बांधून ती टेम्पोला जोडली आहे; जेणेकरून टेम्पो सुरळीत चालवत नेऊन मेकॅनिकपर्यंत घेऊन जाता येईल. टेम्पोचालकाच्या या जुगाडाची कल्पना कोणच्याही डोक्यात यापूर्वी अली नसेल. पण, दुसऱ्या बाजूने विचार करायचा झाल्यास हा जुगाड चालकाला संकटातही टाकू शकतो. त्यामुळे असा स्टंट करण्यापूर्वी चालकानेही सावधगिरी बाळगायला पाहिजे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @ghanthaa इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी मजेशीर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसून आले आहेत. एका युजरने कमेंट केली आहे, ‘भारताकडून चीन जुगाड करायला शिकत आहे; ते माझेच विद्यार्थी आहेत.’ दुसरा युजर म्हणतोय, ‘टेम्पोचालक नक्कीच भारतीय असेल. एकूणच टेम्पोचालकाच्या जुगाडाने भारतीयांची मने जिंकली आहेत, असे म्हणायला हरकत नाही.’

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close