सामाजिक

दोन सख्ख्या चुलत बालकांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ

Spread the love

कळमनुरी / नवप्रहार मीडिया 

                 कळमनुरी तालुक्यातील आखाडा बाळापूर पासून जवळ असलेल्या शेवाळ गावातील नदी पात्रात दोन पाच वर्षीय बालकांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ माजली आहे. हे दोघे सख्खे चुलत भाऊ होते. मुख्य म्हणजे या दोघांचे मृतदेह एकमेकांच्या हातात हात धरून होते.

                        याबाबत घटनास्थळावर मिळालेल्या माहितीनुसार, आखाडा बाळापूरपासून जवळ असलेल्या शेवाळ या गावांमध्ये शुक्रवारी सकाळी ११ वाजता स्वराज दीपक सूर्यवंशी व शिवराज संदीप सूर्यवंशी हे दोन लहान सख्खे चुलत भाऊ वय चार ते पाच वयोगटातील चिमुकले शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून घरासमोर खेळत असताना बेपत्ता झाले होते.

यानंतर घरच्यानी आजूबाजूला खूप शोधण्याचे शोधून पाहिले. परंतु दोन्ही मुले सापडत नसल्याने सदर बातमी गावात पसरून सर्व गावकऱ्यांच्या वतीने गावात सर्वच ठिकाणी दोन मुलांना शोधण्याचे काम सुरू केले होते.

रात्री उशिरा गावाजवळ असलेल्या नदीमध्ये दोन्ही मुलांचे एकमेकांच्या हातात हात घालून सोबत असलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उपस्थित सर्व सर्वांच्या डोळ्यात पाणी आले होते, शेवाळा गावावर शोककळा पसरुन एकही घरी चुल पेटली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close