रक्षा बंधना करीता सजली अंजनगाव बाजार पेठ
लाडक्या बहिणीच्या मिळालेल्या पैस्यामुळे बाजारपेठेत महिलांची गर्दी
अंजनगाव सुर्जी, मनोहर मुरकुटे
बहिण भावाच्या प्रेमळ नात्याचा ऋणानुबंध जपणारा सण म्हणजे रक्षाबंधन . या सणाच्या निमित्ताने अंजनगाव तालुक्यातील बाजारपेठ सजली असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. एकीकडे आपल्या भाऊरायाच्या पसंतीस उतरेल अशी राखी घेण्यासाठी महिलांनी बाजारात गर्दी केली असल्याचे दिसत आहे.तर दुसरीकडे आपल्या बहिणीसाठी भेटवस्तू खरेदी करताना युवा वर्ग सुद्धा व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे.
तसेंच सरकारने महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट म्हणून एकाच वेळेस दोन महिन्याचे तीन हजार खात्यावर आल्यामुळे तें पैसे काढून त्यामधून खरेदी करण्यासाठी सुद्धा बाजारपेठेत महिलांचीच गर्दी सध्यास्थितीत दिसून येत आहे
गेल्या पंधरा दिवसा पासुन अंजनगाव तालुक्यात सतत पाऊस सुरु होता पंण गेल्या दोन दिवसा पासुन पावसाने थोडी विश्रांति घेत ल्या मुळे मजुरांच्या हाताला काम मिळाल्याने व रक्षाबंधन हा महत्वाचा सन अवघ्या काही एक दिवसावर येऊन ठेपलेला आहे रक्षाबंधनानिमित्त शहरात विविध ठिकाणी आकर्षक राख्या विक्रीस दाखल झाल्या आहेत. महिलांना या राख्या भुरळ घालत आहेत.बहिण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक असलेला सण म्हणजे रक्षाबंधन सोमवारी साजरा होणार आहे. मात्र यंदा महागाईमुळे दरांमध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचे राख्या विक्रेत्यांचे सांगण्यात येत आहे. अंजनगाव बाजारपेठेत विविध प्रकारच्या आकर्षक राख्या सह पारंपरिक देव राख्या सारख्या विविध प्रकारच्या राख्या बाजारात विक्रीस दाखल झाले आहेत. कमीत कमी पाच दहा रुपयापासून 50 ते 60 रुपये आणि याहूनही अधिक किमतीच्या विविध प्रकारच्या राख्या रक्षाबंधनानिमित्त बाजारपेठेत उपलब्ध आहेत महिलांकडून राख्यांच्या दुकानात मोठया प्रमाणात गर्दी दिसत आहे. रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत विविध भागांमध्ये लहान मोठी राखीची दुकाने सजल्याची दिसत आहे. बाहेरगावी नोकरी. शिक्षण .
किंवा व्यवसाय निमित्त काही भाऊराय स्वतःच्या गावापासून लांब गेल्यामुळे भाऊरायांना पोस्टाच्या वेळी राखी पोचण्यासाठी आधीपासूनच राखी खरेदी करण्याकडे महिलांचा कल वाढला होता जेणेकरून चांगल्यात चांगली आणि आकर्षक राखी खरेदीस महिलांकडून पसंती दिला जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. दुसरीकडे व्यवसाइकान मध्ये देखील उत्साचे वातावरण आहे किरकोळ विक्रेते आणि सामान्य नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी केली जात आहे राख्यांच्या किमतींमध्ये 50 टक्क्याने वाढ झाल्याचे व्यावसायिक सांगत आहेत.