विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये महिला दिवस साजरा
महिलांनी आदर्श नेतृत्व घडवावे. – डॉ. सारिका सकलेचा
धामणगाव रेल्वे / प्रतिनिधी
धामणगाव एज्युकेशन सोसायटीच्या विद्यानिकेतन सीबीएसई स्कूलमध्ये महिला दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी धामणगाव नगरीतील प्रतिष्ठित डॉ. सारिका सकलेचा यांच्या हस्ते विद्येची देवता सरस्वती माता व स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे प्राचार्य रवी देशमुख उपस्थित होते. डॉ सारिका सकलेचा यांच्या हस्ते शाळेतील सर्व महिला कर्मचारी व शिक्षिका यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच पर्णवी पावडे (जिजाऊ माता),अनुष्का मडावी (कल्पना चावला), जानवी धवणे (सावित्रीबाई फुले), स्वर्णीम राऊत(सरोजनी नायडू), माधवी म्हात्रे (सिंधूताई सपकाळ) या विद्यार्थ्यांनी वेशभूषा साकारली, तसेच एकपात्री नाटिका सादर केली. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ.सारिका सकलेचा यांनी आपल्या मार्गदर्शनात महिलांचे समाजातील स्थान आणि पुरुषांच्या बरोबरीने होणारी प्रगती लक्षात घेता महिलांनी आदर्श नेतृत्व घडवावे असे संबोधले. तर प्राचार्य रवी देशमुख यांनी महिला दिनावर मार्गदर्शन केले. उपस्थित महिला कर्मचारी व महिला शिक्षिकांनी डॉ. सारिका सकलेचा यांना भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. यावेळी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थीत होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल कुर्जेकर यांनी केले. तर आभार प्रदर्शन जुही गुप्ता यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.