सामाजिक

राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान नगर परिषद घाटंजी अंतर्गत बचत गटांणा कर्ज वितरण

Spread the love

 

घाटंजी तालुका प्रतिनीधी- सचिन कर्णेवार
घाटंजी:-दिनांक २५/५/२०२३ रोजी नगर परिषद कार्यालय घाटंजी येथे दीनदयाळ अंत्योदय योजना – राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग या घटकातील पात्र २ बचत गट इंदिरा महिला बचत गट व सहारा महिला बचत गट यांना अनुक्रमे २,८०,०००/- रु. व २,४०,०००/- रु. असे एकून ५,२०,००० रु/- चे धनादेश मा. मुख्याधिकारी अमोलजी माळकर साहेब यांच्या दालनात सभा घेऊन हस्तांतर करण्यात आले.सदर अर्थसहाय्य घेऊन महिला बचत गटाने गृहाउद्योग उभे करावे व आर्थिक साक्षर व्हावे तसेच महिला समाजिक,सांस्कृतिक, आर्थिक बाबतीत सक्षम झाली तर ते घर सर्व बाबतीत समृद्ध होईल व विकसित होईल असे मत मा. मुख्याधिकारी माळकर साहेब यांनी मांडले व मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच एल.यू.एल.एम.समन्वक सदानंद आडे यांनी बचत गटाने कर्ज घेऊन त्याची परतफेड कशा प्रकारे करावी व कर्जाचा विनियोग कसा करता येईल यासंदर्भात माहिती दिली.सदर सभेला दोन्ही बचत गटातील सर्व सभासद हजर होते, तसेच एल.यू.एल.एम. समन्वयक सदानंद आडे, शहर समन्वयक नवीन देशेट्टीवार हजर होते.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close