पाण्याची बचत ही काळाची गरज
सध्या वर्धा जिल्ह्यात उष्णतेचा पारा वाढत असून, सुर्याने आपला प्रकोप दाखवायला सुरुवात केली आहेत. अशा परिस्थितीत लहान मोठ्या जलाशयांची पाण्याची पातळी कमी वेगानं कमी होत चालली आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश जलाशयांमध्ये आता पन्नास टक्के पाणीसाठा शिल्लक आहेत तर जिल्ह्यातील ८ लघुप्रकल्प कोरडे होण्याच्या मार्गावर आहेत, अशा प्रतिकूल परिस्थितीत उन्हाळ्यात जिल्ह्यातील काही भागात जलसंकट निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहेत. त्यासाठी प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना करण्यावर भर देणे गरजेचे आहेत, अशी जिल्ह्यातील नागरिकांची मागणी जोर धरु लागली आहे.
.वस्तुतः जिल्ह्यातील मोठे व मध्यम अकरा जलाशये असुन २२लघु प्रकल्प कार्यान्वित आहेत. यापैकी बहुतांश जलाशयातुन ग्रामीण व शहरी भागाला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहेत. त्याचबरोबर जलाशयातील पाण्याचा वापर शेतात सिंचनासाठी आवश्यकतेनुसार केला जातो, उन्हाळ्यात शेतीच्या सिंचनासाठी जलाशयातुन पाणी सोडले जाते. तूर्तास काही जलाशयातुन सिंचनासाठी पाणी न सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पाण्याचा वापर उन्हाळ्यात पिण्यासाठी होणार असल्याचे सांगण्यात आले आहेत.
तसे पाहता वर्धा शहरात व आजुबाजुच्या लगतच्या परिसरातील गावांना धाम प्रकल्पातुन पाणीपुरवठा होतो. पिंपरीसह १३गावाच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत एक दिवसानंतर आता पाणीपुरवठा केला जात आहे. शहरी भागातील अशिच पाण्याची विदारक परिस्थिती आहेत. त्यामुळे आतापासूनच जलाशयातील पाणी साठ्याचे गावाच्या गरजेनुसार योग्य नियोजन करणे आवश्यक आहेत. सध्या बोर प्रकल्पात४५.११%,निम्न वर्धा प्रकल्पात६१.०१%टक्के, लालना प्रकल्पात३७.६२%,वडगाव-४८.८८%,धाम प्रकल्पात ४८.५२%,पोथरा.२३.८१%,डोंगरगाव५२.२८%,मदन४१ ४५%,पंचधारा प्रकल्पात२३.३४%तसेच सुकळी प्रकल्पात ४४.६१%टक्के पाणीसाठा असल्याची माहिती आहेत.
उन्हाळ्यात पाण्याची पातळी खालावली असलेल्या नागरिकांनी पाण्याचा. वापर जपून करायला हवा.
*प्रतिक्रिया*
पाणी हे आपले जीवन असल्याने आपण दैनंदिन जीवनात पाण्याचा वापर काटकसरीने करायला हवा. आजही अनेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय होतांना दिसून येते, ही मोठी शोकांतिका आहेत. त्यामुळे दैनंदिन जीवनात व सार्वजनिक ठिकाणी प्रत्येकाने सामाजिक भान ठेवून, पाण्याची नासाडी करु नयेत. अनवधानाने सुरू केलेले नळ आपण ,त्याची तोटी बंद करावी. आवश्यक तेथेच पाण्याचा वापर करायला हवा. भविष्यात आपल्याला पाणी पैशाने विकत घेण्याची वेळ येवू देवू नयेत. जल है.तो,अपना जीवन है,या दुष्टीकोनातून आपले कार्य करावे. त्यासाठी पाण्याची बचत करणे, ही आता साप्रंत काळात काळाची गरज बनली आहेत…
अविनाश टाके
सामाजिक कार्यकर्ते
आर्वी जिल्हा* वर्धा
☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️