सामाजिक

साठ्ये कॉलेज मधील आत्महत्याग्रस्त मुलीच्या मोबाईल मध्ये सापडले मेसेज 

Spread the love

          मुंबईतील विलेपार्ले येथील साठ्ये कॉलेज मध्ये शिक्षण घेत असलेल्या आणि नालासोपारा येथे वास्तव्यास असलेल्या 21वर्षीय तरुणी संध्या पाठक हिने कॉलेज क्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली होती. ही आत्महत्या किंवा हत्या असा पोलिसांपुढे प्रश्न उभा होता. पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला होता. पोलिसांना संध्याच्या मोबाईल मध्ये काही मेसेज सापडले आहेत . त्यावरून पोलिस या निष्कर्षावर पोहचले आहेत.

साठ्ये महाविद्यालयातील विद्यार्थिनी संध्या पाठकच्या मृत्यूनंतर पोलिसांनी वेगाने तपास सुरु केला. पोलिसांनी संध्याचे जवळचे मित्र मैत्रिण, शिक्षक वर्ग तसेच घरच्यांकडे चौकशी केली. तसेच चौकशीच्या अनुशंगाने संध्याचा मोबाईलदेखील पोलिसांनी घेतला होता. यानंतर एकतर्फी प्रेमातून आत्महत्या केल्याचा उलगडा पोलिसांना झालाय. तसेच पोलिसांना तिच्या बॅगेत नैराश्येवरील काही औषधेदेखील सापडली आहेत.अधिक पुरावे मिळविण्यासाठी तिचा मोबाइल फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मृत्यूचे कारण समोर आले नव्हते

संध्या पाठक ही 21 वर्षांची होती आणि नालासोपारा येथे राहायला होती. ती विलेपार्लेतील साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेच्या तिसऱ्या वर्गात शिकत होती. गुरूवारी सकाळी 7 वाजता महाविद्यालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून संध्याने आत्महत्या केली. आत्महत्येनंतर तिच्याकडे कुठल्याही प्रकारची चिठ्ठी सापडली नव्हती. त्यामुळे तिच्या मृत्यूचे कारण समोर आले नव्हते.

मुलाला पाठवले मेसेज

संध्याच्या मृत्यूनंतर विलेपार्ले पोलिसांनी तिचा मोबाइल आणि बॅग ताब्यात घेतली होती. संध्याने एका मुलाला पाठवलेले अनेक मेसेजेस तिच्या मोबाईलमध्ये पोलिसांना मिळाले. तसेच संध्याच्या बॅगमध्ये नैराश्यावरील गोळ्या सापडल्या ह. यातून हे प्रकरण एकतर्फी प्रेमातून घडल्याची शक्यता विलेपार्ले वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे.

मुलाची होणार चौकशी

संध्याने आत्महत्येपुर्वी एका मुलाच्या मोबाईलवर अनेक मेसेज पाठवले होते. पोलिसांकडून आता त्या मुलाची चौकशी केली जाणार आहे. त्याचाही जबाब पोलिसांकडून घेण्यात येणार आहे. तसेच तिला नेमका कुठला आजार होता? याचा तपास सुरु आहे. संध्या पाठकच्या पार्थिवावर नालासोपाऱ्याच्या आचोळे येथे गुरूवारी रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close