क्राइम

ढाब्यावर रचला गेला सरपंचाच्या हत्येचा कट 

Spread the love

ढाब्यावर रचला गेला सरपंचाच्या हत्येचा कट 

ढाब्यावर शिजला हत्येचा कट

नांदूरा फाट्यावरील ढाब्यावर आरोपींची मिटींग

आदल्या रात्रीच ठरला हत्येचा प्लॅन

बीड / विशेष प्रतिनिधी 

               जिल्ह्यातील मस्साजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे नागरिकांत संतापाची लाट उसळली आहे.या हत्याकांडात सहभागी आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. चौकशी दरम्यान  देशमुख यांच्या हत्येचा कट एक दिवसापूर्वी ढाब्यावर बसून रचला असल्याचे समोर आले आहे.

 आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी नांदूरा फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. पाहुया त्यासंदर्भातला एक स्पेशल रिपोर्ट..

ढाब्यावर शिजला हत्येचा कट-

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला हत्या झाली. मात्र या हत्याच कट एक दिवस आधीच रचण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले या दोघांनी नांदूरा फाटा परिसरातील एका धाब्यावर बसून देशमुखांच्या हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आलीय.

घटनाक्रम –

– 8 डिसेंबर- आरोपी विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांनी एका ढाब्यावर हत्येचा कट रचला

– 9 डिसेंबर – कटानुसार सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली

– बीडच्या नांदूर फाटा परिसरातील एका ढाब्यावर हत्येचा कट

– 14 जानेवारी – रोजी संबंधीत ढाबा चालकाची चौकशी

– कट रचत असताना ढाब्यावर विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेसोबत इतरही काही लोक असल्याची माहीती

– कटात अजून कुणाचा सहभाग शोध सुरू

सरपंच देशमुख यांची हत्या ही पूर्वनियोजित कट होता हे यावरून स्पष्ट होत आहे. आरोपींनी कट करून संतोष देशमुखांची निर्घृण हत्या केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींव्यतिरिक्त या कटात अजून कोण कोण सहभागी होतं याचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळणेही तितकंच महत्वाचं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close