राजकिय

संतोष बांगर यांचा 100 गाड्यांचा ताफा जरांगे यांच्या भेटीला ! काय आहे कारण 

Spread the love

छत्रपती संभाजीनगर  / नवप्रहार डेस्क 

                 काही दिवसांपूर्वी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी वेळ पडल्यास उमेदवार उभे करण्यचे सूतोवाच केले होते. सोबतच ज्या ठिकाणी निवडून येण्याची शक्यता आहे त्याच ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. मनोज जरांगे यांनी कोणकोणत्या मतदारसंघातून लढणार याची यादी जाहीर केली आहे. मराठवाड्यातील काही मतदारसंघांची यादी मनोज जरांगेंकडून आली आहे

यात शिवसेना शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या कळमनुरी मतदारसंघाचा समावेश आहे. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी तातडीने त्यांच्या ताफा अंतरवाली सराटीकडे वळवला आहे. थोड्याच वेळात ते मनोज जरांगेंची भेट घेणार आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा-मुस्लिम-दलित (एमएमडी) फॉर्म्यूला तयार करुन निवडणूक लढण्याची तयारी केली आहे. त्यांनी मराठवाड्यातील काही मतदारसंघात निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यांच्या यादीत कळमनुरीतून संतोष बांगर यांना पाडण्याची भूमिका घेण्यात आली आहे. शिवसेना शिंदें गटाचे संतोष आमदार यांनी याचा धसका घेतला आहे. मनोज जरांगे यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर संतोष बांगर हे तातडीने 100 वाहनांचा ताफा घेऊन अंतरवालीकडे निघाले. मनोज जरांगे यांना कळमनुरीतील उमेदवार पाडण्याची भूमिका बदलण्यासाठी आग्रह करणार असल्याचे ते म्हणाले.

मनोज जरांगे म्हणाले की, थोडेच उमेदवार दिले आहेत. कारण आपले लोक तिथं असले पाहिजे. जिथे उमेदवार दिले नाही, तिथे पाडायचे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. उद्या उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर मनोज जरांगे यांचे उमेदवार कोण असतील ते स्पष्ट होईल. मराठा आरक्षणासंबंधी ज्यांनी आम्हाला बाँड पेपरवर लेखी आणि व्हिडिओग्राफी करुन देईल त्याला पाठिंबा देणार आहोत, असेही ते म्हणाले.

1) भोकरदन, (जालना )
2) गंगापूर, (छत्रपती संभाजीनगर)
3) कळमनुरी, (हिंगोली )
4) गंगाखेड, (परभणी )
5) जिंतूर, (परभणी)
6) औसा-(लातूर)

1) हिंगोली
2) केज
3) कन्नड
4) परतूर
5) फुलंब्री
6) भोकरदन
7) पाथरी
8) बीड

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
2
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close