क्राइम

शतकवीर  वाहन चोर ; 3 वर्षात चोरली 100 वाहने 

Spread the love

             काही गोष्टी वाचून आश्चर्य वाटते. या गोष्टी वाचून धक्का बसतो.असाच धक्का देणारा प्रकार आंध्रप्रदेश येथील चोराने दिला आहे. पोलिसांनी एका चोरट्याला पकडले असून, त्याने तीन वर्षात 100 दुचाकी चोरल्याची माहिती समोर आली आहे.

जप्त केलेल्या वाहनांची किंमत
जप्त केलेल्या वाहनांची किंमत सुमारे 1.45 कोटी रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीविरुद्ध केआर पुरम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडे दुचाकी चोरीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या, त्यानंतर त्यांनी परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी सुरू केली. बऱ्याच प्रयत्नांनंतर चोरट्याला पकडण्यात आले. चौकशीत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे.

यूट्यूबवर व्हिडिओ पाहून बाईक चोरायला शिकला
यापूर्वीही असाच एक प्रकार समोर आला आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर जिल्ह्यातील एका तरुणाने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून बाईक चोरायचे शिकला आणि शहरात चोरी करू लागला. व्यंकटेश्वरुलु असे या तरुणाचे नाव आहे. वेंकटेश्वरुलूने यूट्यूबवरून चावी हरवल्यास बाइक कशी सुरू करायची हे शिकून घेतले आणि नंतर चोरी करण्यासाठी त्याचा वापर केला. दुचाकी चोरल्यानंतर तो त्या OLX वर विकायचा आणि कमिशन मिळवायचा.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close