ठाणा (पे.प.)येथे संताजी जगनाडे महाराज स्मृती सोहळा २० व 21 जानेवारी रोजी

जवाहरनगर: संत श्री जगनाडे महाराज तेली संघटना ठाणा पेट्रोलपंप द्वारे श्री संताजी जगनाडे महाराज स्मृती सोहळा निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन मधुबन सभागृह येथे करण्यात आले आहे. यात शनिवार दिनांक २० जानेवारी रोजी दुपारी १:०० वाजता मकर संक्रांति निमित्त महिलांकरिता हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उद्घाटन महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा महिला आघाडी विभागीय अध्यक्षा नयना झाडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी कल्याणी भुरे हे राहतील. यावेळी जि प सदस्य आशा डोरले, पं स सदस्य कल्पना कुर्जेकर, सरपंच दुर्गा हटवार, नंदा वंजारी, मंगला देवगडे, माजी सरपंच कल्पना निमकर, ग्रामपंचायत सदस्य रश्मी मेहर, मंदा लांजेवार उपस्थित राहतील. सायंकाळी ५:०० वाजता विद्यार्थ्यांसाठी सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा विविध वयोगटात घेण्यात येणार आहे. रविवार दिनांक २१ जानेवारी रोजी सकाळी ८:०० वाजता श्री संत जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पालखी सोहळा ह भ प श्याम फटिक महाराज यांच्या हस्ते श्री गुरुदत्त मंदिर येथे पूजन व शुभारंभ होणार आहे. यावेळी जय भोले बाल गायन दिंडी मंडळ बेरडी- छिंदवाडा यांचे भक्त मंडळी उपस्थित राहतील. सकाळी ११:०० वाजता अल्पपोहार, दुपारी १२:३० वाजता विविध कार्यक्रमाचे उद्घाटन रातुम नागपूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. संजय दुधे यांच्या हस्ते होणार आहे,अध्यक्षस्थानी विदर्भ तेली महासभा चे केंद्रीय सरचिटणीस डॉ. नामदेव हटवार उपस्थित राहतील. यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे प्र कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, उपविभागीय अधिकारी गजेंद्र बालपांडे, महाराष्ट्र प्रांतीय तैलिक महासभाचे विभागीय अध्यक्ष जगदीश वैद्य, विदर्भ तैलिक महासभा चे केंद्रीय उपाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे, जि प सदस्य आशा डोरले , पं स सदस्य कल्पना कुर्जेकर, सरपंच गणेश मोथरकर, रवींद्र चरडे, उपसरपंच राजेश वाघमारे, स्नेहीपुकारचे संपादक राजेश पिसे, महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभाचे जिल्हासचिव अभिजीत वंजारी, विकास लेंडे, धनराज राखे, माजी सरपंच शिवदास उरकुडे, राजहंस वाडीभस्मे, रामचंद्र कारेमोरे, केशव लेंडे, गोरखनाथ किरपान, श्रीराम साठवणे, ग्रा प सदस्य पल्लेस मथुरे, निखिल तिजारे उपस्थित राहतील. दुपारी २:०० वाजता उपवर- वधू नोंदणी व परिचय मेळावा. रात्री ७:०० वाजता सांस्कृतिक कार्यक्रम रात्री ७:३० वाजता स्नेहभोजन आयोजित करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमाला समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तेली समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. चंद्रशेखर गिरडे व सर्व संघटना पदाधिकारी यांनी केली आहे.